Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Parineeti Chopra-Raghav Chadha यांनी शेअर केला मुलाचा पहिला फोटो; नाव

१३,३३३ वा प्रयोग, आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदत; Prashant

गोष्ट Asha Parekh ने शशी कपूरला मारलेल्या करकचून मिठीची!

चित्रपती V.Shantaram यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mahavatar Narsimha : भारतातील Animated चित्रपटांचं भव्य विश्व!

 Mahavatar Narsimha : भारतातील Animated चित्रपटांचं भव्य विश्व!
कलाकृती विशेष

Mahavatar Narsimha : भारतातील Animated चित्रपटांचं भव्य विश्व!

by रसिका शिंदे-पॉल 12/08/2025

हॉरर, हॉरर कॉमेडी, लव्हस्टोरी, बायोपिक्स या भोवतीच सध्या भारतीय चित्रपटांच्या कथा फिरतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही… खरं तर मेकर्स विविध कथा, आशय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत… पण कुठेतरी तोच-तोचपणा प्रेक्षकांना वाटत असल्यामुळे पुन्हा एकदा लोकांचा कल आता Animated Movies कडे वळायला लागला आहे… अगदी ओटीटीवरही Anime पाहण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे… आणि त्यातच ‘महावतार नरसिंहा’ या चित्रपटाने तर प्रेक्षकांना वेड लावंल आहे… बऱ्याच काळानंतर खरं तर तमिळ,तेलुगूसह हिंदीतही पौराणिक कथा मांडणारा Animated चित्रपट आल्यामुळे प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं पाहण्याचा अनुभव आला… महत्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी वर्जनने १०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे… चला तर मग महावतार नरसिंहा चित्रपटाची भारतातील क्रेझ आणि एकूणच भारतातील Animated Movies चा आढवा घेऊयात… (Mahavatar Narsimha Movie news)

तर, आधी जरा सध्या ट्रेण्डिंग असणाऱ्या ‘महावतार नरसिंहा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे त्याची आकडेवारी जाणून घेऊयात.. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.६ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.५ कोटी, चौथ्या दिवशी ६ कोटी, पाचव्या दिवशी ७.७ कोटी, सहाव्या दिवशी ७.७ कोटी, सातव्या दिवशी ७.५ कोटी, आठव्या दिवशी  ७.७ कोटी, नवव्या दिवशी १५.४ कोटी, दहाव्या दिवशी २३.१ कोटी, अकराव्या दिवशी ७.३५ कोटी, बाराव्या दिवशी८.५ कोटी, तेराव्या दिवशी ६ कोटी, चौदाव्या दिवशी ५.३६ कोटी, पंधराव्या दिवशी ७.५ कोटी, सोळाव्या दिवशी २०.५ कोटी, सतराव्या दिवशी २३.५ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण १६९ कोटी कमावले आहेत आणि त्यापैकी १२६.९ कोटी हिंदी वर्जनने कमावले आहेत…(Mahavatar Narsimha box office collection)

खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीला Animated चित्रपटांचा देखील अलौकिक वारसा लाभला आहे… भारतात १९५७ मध्ये ‘द बनियन डिअर’ (The Banayan Deer) हा पहिला रंगीत Animated चित्रपट तयार करण्यात आला होता… भारतीय चित्रपट विभागाच्या कार्टून युनिटने कागदावर निसर्गचित्र, हरणाचं चित्र आणि एकूणच कथानक चित्रकलेच्या माध्यमातून पेपरवर रेखाटलं होतं… विशेष म्हणजे गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या काही कथावर आधारित या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली होती… आणि अगदी प्राथमिक अॅनिमेशन तंत्रज्ञानांच्या मदतीने हा पहिला रंगीत अॅनिमेटेड चित्रपट तयार केला गेला होता.. (Indian Animated Movies)

पुढे कालांतराने बरेच अॅनिमेटेड चित्रपट भारतात आले…  आणि रंगीत चित्रपटांसोबत भारतात अॅनिमेटेड चित्रपटही तयार होऊ लागले… भारतीय अॅनिमेशनचे जनक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या राम मोहन यांनी ‘रामायण : द लेजेंड ऑफ प्रिन्स रामा’ (Ramayana : The Legend of Prince Rama) या All time blockbuster Animated चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन केलं होतं… मुळात अॅनिमेशनची सुरुवात जपानी मेकर्सने केली होती आणि त्याच जपान व भारताने मिळून तायर केलेल्या या रामायण अॅनिमेडट सीरीजसमोर आज हजारो कोटींच्या घरात तयार केले जाणारे चित्रपटही फेल आहेत…

भारतातील काही गाजलेले अॅनिमेडेट चित्रपट म्हणजे ‘छोटा भीम’, ‘बाल गणेशा’, ‘मोटू पतलू’, ‘अलीबाबा’, ‘घटोत्कच’, ‘क्रिष्णा और कंस’, ‘महाभारत’ अशा बऱ्याच अॅनिमेटेड चित्रपटांचा ऑडियन्सही फार निराळा आणि मुळात सर्व वयोगटातील प्रेक्षकांना या पठडीतील चित्रपट पाहायला आवडतात…

================================

हे देखील वाचा : Uma Devi : बॉलिवूडच्या पहिल्या कॉमेडी क्वीनचं वेदनादायी आयुष्य….

=================================

सध्या बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड प्रेक्षकांना अपेक्षित आपल्या मातीतला किंवा आपल्या संस्कृतीतला कंटेन्ट त्यांना मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षक अॅनिमेटेड चित्रपटांकडे वळले आहेत.. कारण, या चित्रपटांमधून मेकर्स भारताचा इतिहास, संस्कृती, पौराणिक कथा Explore करतात… महत्वाचं म्हणजे अॅनिमेटेड चित्रपट मेकर्स त्यांना प्रेक्षकांना काय दाखवायचं आहे यापेक्षा प्रेक्षकांना कोणता कंटेन्ट पाहण्याची आवड आहे याकडे विशेष लक्ष देत असल्यामुळे भारतात आणि जगातही अॅनिमेडेट चित्रपट सुपरहिट होतात… आता ‘महावतार नरसिंहा’ या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा असाच अॅनिमेडेट चित्रपट येणार का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे… कारण, २००० च्या काळात बॅक टू बॅक अॅनिमेटेड चित्रपट येत होते… मात्र, आधुनिक तंत्रज्ञान चित्रपटांमध्ये वापरायला सुरुवात करुनही फारसे चित्रपट अॅनिमशेनच्या साहायय्याने निर्मित केले जात नव्हते… परंतु, आता तरी हे चित्र बदलावं आणि पुन्हा एकदा अॅनिमेशनच्या चित्रपटांचा ट्रेण्ड परत यावा अशी प्रेक्षकांची मागणी आहे… त्यामुळे येत्या काळात ही मागणी पुर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: animated movies animated movies in india Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment hanuman indian animated movies mahavatar cinematic universe Mahavatar Narsimha ramayana the legend of prince rama
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.