Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Mahavatar Narsimha चित्रपटाचं सैय्याराच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर कलेक्शन झालंय तरी किती?
सध्या सगळीकडे ‘सैय्यारा’ चित्रपटाचीच चर्चा आहे… नवोदित कलाकारांच्या या पहिल्याच चित्रपटाने फारच कमी दिवसांत २०० कोटींचा टप्पा गाठला आहे… आता सैय्यारा पाठोपाठ ‘महावतार नरसिम्हा’ या Animated चित्रपटाने प्रेक्षकांना वेडं केलं आहे… २५ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या या दाक्षिणात्य सिनेविश्वातील एनिमेटेड चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली आहे जाणून घेऊयात…

तर, सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.६ कोटी, तिसऱ्या दिवसी ९.५ कोटी, चौथ्या दिवशी ६ कोटी, पाचव्या दिवशी ७.७ कोटी, सहाव्या दिवशी २.१८ कोटी कमवत आत्तापर्यंत या चित्रपटाने ३१.७३ कोटींची कमाई केली आहे… तर, ‘सैय्यारा’ चित्रपटाने २६९.४५ कोटींची कमाई केली आहे…
================================
=================================
‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केलं आहे… आणि या चित्रपटाची प्रस्तुती Hombale Films यांनी केली आहे… दरम्यान, एकीकडे साऊथ थ्रिलर, क्राईम, हॉरर चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग दिवसागणिक वाढत चालला असून आता Animated चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत एक नवा प्रेक्षकवर्ग तयार केला जात आहे यात शंकाच नाही…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi