‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; सनबर्न एरेना,
महेंद्र कपूरचे पहिले फिल्मफेअर आणि मुकेशने केले अभिनंदन!
महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) या गुणी गायकाने पन्नासच्या दशकाच्या अखेरीस हिंदी सिनेमात गायला सुरुवात केली. त्यांची निवड एका देश पातळीवर झालेल्या टॅलेंट हंट स्पर्धेतून झाली होती. त्यानंतर १९६० सालच्या ‘नवरंग’ या चित्रपटातून खऱ्या अर्थाने त्यांना लोक ओळखू लागले. महेंद्र कपूर यांना पहिला सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्म फेअर पुरस्कार १९६३ सालच्या ‘गुमराह’ या चित्रपटातील गाण्यासाठी मिळाला. या सिनेमातील ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो…’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
या पुरस्काराच्या वेळचा एक भावस्पर्शी किस्सा महेंद्र कपूर यांनी स्वतः एका रेडिओवरील मुलाखतीत सांगितला होता. त्या काळात फिल्मफेअरचे पुरस्कार हे आधीच डिक्लेअर होत असत. (आता सारखे ऐन वेळी स्टेज वर नाही) मुख्य कार्यक्रमात फक्त त्याचे वितरण होत असे. अशा पद्धतीने १९६३ सालच्या चित्रपटांचे पुरस्कार १९६४ साली जाहीर झाले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्कारासाठी दोन नामांकने होती. पहिले नामांकन मोहम्मद रफी यांना ‘मेरे मेहबूब’ या चित्रपटातील शीर्षक गीतासाठी होते. तर दुसरे नामांकन महेंद्र कपूर यांना ‘गुमराह’ या चित्रपटातील ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो….’ या गाण्यासाठी होते. महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांना त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या घरी अर्थातच खूप आनंदाचे वातावरण झाले. पण फिल्म इंडस्ट्रीतील कुणीही त्यांचे अभिनंदन पहिल्या दिवशी केले नाही!
महेंद्र कपूर यांना थोडेसे विचित्र वाटले. त्यांना असे वाटले की कदाचित या पुरस्काराला आपण पात्र नसावेत आणि आपल्याला हा पुरस्कार मिळाला हे फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांना आवडले नसावे म्हणून कदाचित कुणी आले नसेल, आपले अभिनंदन केले नसेल. पुरस्कार घोषित होऊन देखील महेंद्र कपूर यांच्या मनात हि एक खंत सलत होती. दोन दिवस असेच गेले. पण तिसऱ्या दिवशी मात्र चमत्कार झाला. पार्श्वगायक मुकेश हे स्वतः पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या घरी दाखल झाले! जेव्हा महेंद्र कपूर यांना कळाले की आपल्या घरी स्वत: पार्श्वगायक मुकेश आलेले आहेत तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला.
महेंद्र कपूर यांच्या वडिलांनी मुकेश यांचे स्वागत केले. मुकेश यांनी महेंद्र कपूर यांना पुष्पगुच्छ दिला , एक पेढा त्यांना भरवला , त्यांना मिठी मारली आणि त्यांचे अभिनंदन केले. महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. महेंद्र कपूर यांचे वडील मुकेश यांना म्हणाले,” मुकेश जी आपने क्यू तकलीफ उठाई” हम लोग आपके पास आ सकते थे..” त्यावर मुकेश म्हणाले,” असे कसे? महेंद्र कपूर यांचा हा पहिलाच पुरस्कार आहे. तो माझ्या धाकट्या भावासारखा आहे आणि त्याचे कौतुक आम्ही केलेच पाहिजे. माझ्या धाकट्या भावाच्या या आनंद सोहळ्यामध्ये मी सामील होणे गरजेचे आहे आणि त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळेच मी आलो आहे!”
महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांनी मुकेशला वाकून नमस्कार केला. मुकेश म्हणाले ,” महेंद्र तू खूप चांगला गायक आहेस. खूप मेहनत घे. मोठा हो. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. रफी साहेब देखील तुला शुभेच्छा द्यायला येणार आहेत सध्या ते आपल्या देशात नाहीत परदेशात आहेत.” महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या मनातील शंकेचे मळभ क्षणात दूर झाले. मुकेश एवढ्यावरच थांबले नाहीत तर यांनी फिल्म फेअर अवॉर्ड सोहळ्यात आले. सतेज वर येवून महेंद्र कपूर चे जाहीर कौतुक केले. आणि एक गाणे देखील काय गायले.
==============
हे देखील वाचा : …आणि धर्मेंद्र यांनी परस्परांच्या सिनेमाच्या मुहूर्ताला उपस्थित राहून क्लॅप दिली!
==============
त्या काळातील स्पर्धा खूप हेल्दी होती. स्पर्धा नक्की होती पण द्वेष नव्हता. मत्सर नव्हता. उलट कोणी काही चांगलं करत असेल तर त्याला शाबासकी देऊन त्याची पाठ थोपटली जात होती. महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांना पाच वेळेला फिल्मफेअरच्या नामांकन मिळाले. त्यापैकी तीन वेळेला ते सर्वोत्कृष्ट गायक या कॅटेगिरीतील विजेते होते. गाणी होती – ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो’ (गुमराह) मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती (उपकार) आणि ‘और नही बस और नही’ (रोटी कपडा और मकान)