Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aamir Khan आणि पाकिस्तानबद्दलची ‘ती’ विधानं!

Govinda वर चित्रित एका सॅड सॉंगच्या निर्मितीचा भन्नाट किस्सा!

Amruta Subhash हिच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर ‘जारण’

Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात

Marathi Movies : थिएटर गाजवल्यानंतर ‘हे’ मराठी चित्रपट ओटीटीवर रिलीज

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….

 Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….
कलाकृती तडका

Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….

by रसिका शिंदे-पॉल 30/04/2025

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. शिवाय कलाकारांच्या अफेअर्सबद्दलही बऱ्याच चर्चा मनोरंजनसृष्टीच्या वर्तुळात रंगत असतात. जुन्या काळातील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती महेश भट्ट  (Mahesh Bhatt) आणि परवीन बाबी (Parveen babi) यांची जोडी. त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक होतं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये परवीन बाबी (Parveen Babi) सोबत असलेलं त्यांचं नातं एक मोठा टर्निंग पोईंट होता असं महेश भट्ट यांनी म्हटलं आहे. परवीन सोबतचं नातं अत्यंत वाईट परिस्थितीत संपलं याचं दु:खं असल्याचही त्यांनी म्हटलं. परवीनच्या मानसिक स्थितीमुळे आलेला दुरावा फार त्रासदायक होता अशी कबूली देखील महेश भट्ट यांनी दिली. (Bollywood trending news)

महेश भट्ट यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या आणि परवीन बाबीच्या नात्याबद्दल आणि परवीन यांच्या मानसिक स्थितीबद्दल भाष्य केलं. महेश म्हणाले की, “मी परवीनला खचताना पाहिलं आहे. मानसिकरित्या किंवा त्या आजारातून ती जात असताना मी तिच्यासोबत होतो. परवीन एखाद्या प्राण्यासारखी कोपऱ्यात थरथरत, घाबरत बसलेली असायच. तिला सारखं कुणीतरी तिचा जीव घेईल असं वाटत राहायचं.मी सर्वतोपरी तिची मदत करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, आमचं नातं तिच्या आजारामुळे पुढे जाऊ शकलं नाही”. (Mahesh Bhatt)

परवीन बाबी महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनमध्ये येण्यापू्र्वी कबीर बेदी यांच्यासोबत रिलेशनमध्ये होती. भट्ट यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं की, “कबीरनेही तिची मानसिक अवस्था ढासलताना पाहिलं आहे. मात्र, त्यावेळी कबीरला ती मानसिक आजाराने त्रस्त आहे याची माहिती नव्हती. त्याने खरं तर पहिल्यांदा इटलीत असताना परवीनच्या मानसिक आजाराची जलक पाहिली होती, परंतु त्याची गंभीरता त्याला तेव्हा जाणवली नव्हती. मी देखील जेव्हा तिच्यासोबत नात्यात आलो मलाही तिच्या मानसिक आजाराविषयी काहीच माहित नव्हते”, अशी कबूली देखील महेश यांनी दिली. (Entertainment)

महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि परवीन बाबी (Parveen Babi) ज्यावेळी रिलेशनमध्ये होते तेव्हा परवीनचं वय २६ होतं. महेश यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, यु.जी. क्रिश्नमुर्ती यांनी परवीन बाबीला तिच्या मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी मदत केली होती. पण त्याचा काहीही हवा तसा उपयोग झाला नव्हता. शेवटी क्रिश्नमुर्ती महेश यांना म्हणाले होते की तु चित्रपट करणं सोडणार नाहीस आणि जर का परवीन चित्रपट करत राहिली तर तिचं आयुष्य उध्वस्त होईल”. (Bollywood couples)

कालांतराने महेश आणि परवीन यांचं नातं संपलं आणि दोघं वेगळे झाले. परवीन यांच्या अवस्थेबद्दल बोलताना महेश म्हणाले की, परवीन आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होती हे मी पाहिले होते. पण त्यावेळी मी तिला काहीच मदत करु शकलो नाही आणि तिच्यापासून स्वत:ला लांब ठेवण्याचा निर्ण घेतला. तिला स्किझोफ्रेनिया (schizophrenia) होता आणि त्यामुळेच तिची मानसिक स्थिती नंतर फारच बिकट होत गेली… (Bollywood untold stories)

===============================

हे देखील वाचा:   अमिताभ बच्चन यांनी मला ठार मारण्याच्या प्रयत्न केला; परवीन बाबी यांनी केला होता गौप्यस्फोट..

===============================

परवीन बाबी एकेकाळची सुपरहिट अभिनेत्री होती. आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे तिचे लाखो चाहते होते. ७०-८० च्या दशकात आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलमुळे तिने यशाचं शिखर गाठलं होतं. त्या दशकातील परवीन बाबी य़शस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. यशाच्या शिखरावर असताना मानसिक आजाराने मात्र तिला घेरलं आणि त्यातच तिला दुर्दैवी मृत्यू झाला होता. परवीन बाबीने अभिनय कारकिर्दित ‘चरित्र’, ‘त्रिमुर्ती’, ‘पती, पत्नी और वो’, ,‘चांदी सोना’, ‘मजदूर जिंदाबाद’, ‘दीवार’,’ मजबूर’, ‘दो और दौ पाँच’, ’शान’, ‘कालिया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. (Parveen Babi Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood movies Entertainment mahesh bhatt Parveen Babi parvin babi movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.