Astad Kale : ‘छावा’ वाईट चित्रपट; स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्तादचं धक्कादायक

Devmanus Trailer : ‘देवमाणूस’चा भावनांनी भरलेला उत्कंठावर्धक ट्रेलर आला भेटीला
महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘देवमाणूस’ (Devmanus) चित्रपटाचा भावनिक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. (Marathi movie trailer)

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi films)

चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस माझ्यासाठी अत्यंत जवळचा चित्रपट आहे. भावना, नाट्य आणि थरार यांचा सुरेख संगम या चित्रपटात आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. प्रेक्षक या कथेशी आणि पात्रांशी कसा संवाद साधतात हे पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.” (Devmanus Movie)
==================
हे देखील वाचा : Mahesh Manjarekar :‘देवमाणूस’ मधील ‘पांडुरंग’ आला प्रेक्षकांच्या भेटीला
==================
दरम्यान, लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment)