
Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट
मराठीच नाही तर हिंदी आणि अगदी साऊथ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची अविट छाप उमटवणारे ग्रेट आर्टिस्ट म्हणजे महेश मांजरेकर…. ३ दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या दिग्दर्शन, अभिनयाने गाजवणाऱ्या महेश यांचा आज (१६ ऑगस्ट) वाढदिवस… महेश यांनी आपल्या अभिनयाचा आवाका केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित न ठेवता ते अगदी तमिळ, बंगाली भाषेतही कामं केली.. चला तर मग डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला एक अवलीया कलाकार महेश मांजरेकर यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात…

महेश मांजरेकर यांनी डॉन बॉस्को हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केलं… लहानपणासूनच अभिनयाचं वेड असणाऱ्या मांजरेकरांनी कॉलेजमध्ये असतानाच थिएटर करायला सुरुवात केली. १९८४ साली ‘अफलातून’ या मराठी नाटकातून त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्यांनी ‘ऑल द बेस्ट’, ‘ध्यानीमनी’, ‘गिधाडे’ या नाटकांमध्ये कामं केली…(Entertainment News)
एकीकडे नाटकामध्ये विविधांगी भूमिका स्वीकारताना दुसरीकडे चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि १९९२ मध्ये ‘जीवा सखा’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं… या चित्रपटात त्यांनी ‘इन्स्पेक्टर जमदाडे’ ही भूमिका साकारली होती. पुढे काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, देवमाणूस, रेगे, मुळशी पॅटर्न अशा अनेक मराठी चित्रपटांत ते दिसले…Badsha – The Don बंगाली, Encounter Daya Nayak कन्नडा, Okkadunnadu तेलुगू, Slumdog Millionaire इंग्रजी अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या…(Mahesh Manjrekar movies)
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : सामान्य माणसाचा बुलंद रुपेरी आवाज!
=================================
प्रामुख्याने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘वास्तव’ व ‘अस्तित्व’ हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले. १९९५ मध्ये मराठी चित्रपट ‘आई’ या चित्रपटाद्वारे मराठी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. तर, १९९९ मध्ये हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘वास्तव: द रिअॅलिटी’ मधून त्यांनी हिंदी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हिंदीतील या पहिल्याच दिग्दर्शकिय चित्रपटाने त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली… यानंतर हतियार (२००२), पिताह (२००२) आणि विरुद्ध (२००५) या हिंदी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं…

‘स्लमडॉग मिलेनियर’ हा हॉलिवूड चित्रपट महेश यांच्या अभिनय कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. डॉन जावेद म्हणून स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हॉलिवूडमध्येही उत्तम कामगिरी बजावली… अभिनय, दिग्दर्शनासोबत महेश मांजरेकर यांना गायनाची देखील आवड आहे… ‘कांटे’, ‘सिटी ऑफ गोल्ड- मुंबई 1982: एक अनकही कहानी’, अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी देखील गायली आहेत… शिवाय, नुकत्याच रिलीज झालेल्या रजनीकांत यांच्या कुली चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे… खऱ्या अर्थाने पॅन इंडिया कलाकार असणाऱ्या महेश मांजरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi