Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

“मी ४५० कोटींचा चित्रपट करणारच…”, Mahesh Manjrekar यांनी व्यक्त केला विश्वास
मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला… आजवर विविधांगी विषयांवर भाष्य करणाऱ्या महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा विषय शेतकरी आत्महत्या हा होता; जो खरं तर प्रत्येक सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे… समाजातील अडचणींवर भाष्य करणारे चित्रपट येत असून त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे… अशातच एका मुलाखतीत मांजरेकरांनी लवकरच ४५० कोटींचा चित्रपट घेऊन येणार असल्याचं म्हटलं… नेमकं ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…
महेश मांजरेकर यांनी ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “आपल्याकडे मराठीत विषय चांगले आहेत, त्यामुळे एखादा चांगला विषय आणि जास्तीचं बजेट असलेला चित्रपट होईल तेव्हा आपण नक्कीच चारशे-पाचशे कोटींचा चित्रपट करू शकतो. तुम्हाला चारशे-पाचशे कोटींमध्ये पोहोचायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण देशभरात पोहोचावं लागेल”. (Marathi Entertainment News)

पुढे त्यांनी साऊथ चित्रपटांच उदाहरण देत म्हटलं, “‘कांतारा’ फक्त कन्नड भाषेत असता तर त्या सिनेमाने इतकी कमाई केली नसती. पण, ‘कांतारा’, ‘केजीएफ’ किंवा ‘केजीएफ २’सारखे सिनेमे पूर्ण देशभरात प्रदर्शित झाले, त्यामुळेच ते कोटींची कमाई करू शकले; त्यामुळे आपल्यालाही देशभरात प्रदर्शित होणारा आणि सगळ्या भाषेत रिलीज होणारा चित्रपट करावा लागेल.”
तसेच, मांजरेकर असं देखील म्हणाले की, “मी एक असा चित्रपट करेन, जो ४५० कोटींचा व्यवसाय करेल आणि तो वाजेल. मी एक मोठा टॉर्च घेऊन निर्मात्याला शोधत आहे, कारण तो सिनेमा किमान १०० कोटींचा तरी असला पाहिजे. सगळ्याचं सोंग आणता येतं; पण पैशांचं सोंग आणता येत नाही, त्यामुळे मला एखादा निर्माता असा भेटला पाहिजे जो म्हणेल की, हे १०० कोटी घे आणि कर चित्रपट. तो एक विश्वास पाहिजे. मग मी दाखवून देईन की आपण काय करू शकतो.”
================================
================================
दरम्यान, महेश मांजरेकरांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ आणि २००९ मध्ये आलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा थेट काहीही संबंध नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने २ कोटींच्या पुढे कमाई केली आहे.. या चित्रपटात त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने आणि सयाजी शिंदे अशी भक्कम स्टारकास्ट आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi