Prarthana Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक झाला व्हायरल
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही तितकीच असून यात भर म्हणून हा आगामी चित्रपट मांजरेकर घेऊन आले आहेत. मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून, टिझर पाहून या सिनेमाबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढली आहे. आतापर्यंत विविध सकारात्मक, नकारात्मक भूमिकांमध्ये दिसलेले मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत झळकत आहेत. (Punha Shivajiraj Bhosle movie)

या गाण्यात महेश मांजरेकर यांचा साधू रूपातील अतिशय वेगळा लूक पाहायला मिळत आहे. डोक्यावर भगवा कपडा, गळाभोवती रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख, या सर्वांमुळे त्यांची व्यक्तिरेखा प्रचंड उठून दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील तीव्रता, डोळ्यातील चमक आणि व्यक्त होणारा करारी भाव पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी चाळवली आहे.
महेश मांजरेकर आपल्या या लूकविषयी म्हणाले, ‘’आजवर मी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु साधूच्या व्यक्तिरेखेत मी कधीच दिसलो नव्हतो. हा लूक माझ्या नेहमीच्या लूकपेक्षा पूर्ण वेगळा आहे. यातली गूढता, ताकद आणि अध्यात्मिक छटा हे सगळं एकत्र येऊन या भूमिकेला एक आगळावेगळा आयाम मिळाला आहे. माझ्यासाठी ही एक नवी आणि वेगळीच अभिनययात्रा ठरणार आहे.” (Mahesh Manjrekar movies)
================================
=================================
झी स्टुडिओज प्रस्तुत, द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित हा चित्रपट येत्या ३१ ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध या चित्रपटाचे निर्माते असून यात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi movies 2025)