Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Rajinikanth : ५० नॉट आऊट; कलाकारांनी केला शुभेच्छांचा वर्षाव!
सुपरस्टार रजनीकांत यांनी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयक्षेत्रातील ५० वर्ष पुर्ण केली… ब्लॅक अॅंण्ड व्हाईट ते अगदी आधुनिक तंत्रज्ञान असेलल्या 4D चित्रपटांपर्यंतचा प्रवास करणाऱ्या रजनीकांत यांना कलाकारांनी इंडस्ट्रीत ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत… खरं तर रजनीकांत म्हणजे केवळ अंभिनेते नसून ती तमाम भारतीय लोकांच्या मनातील एक भावना, श्रद्धा आहे…(Latest News of Rajinikanth)

रजनीकांत यांची इंडस्ट्रीतील पन्नाशी आणि ‘कुली’ (Coolie) चित्रपट हा एक सुंदर योगायोग जुळून आला आहे… याच निमित्ताने अभिनेते मोहनलाल यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत… मोहनलाल यांनी लिहिले आहे की, मोठ्या पडद्यावर ५० वर्ष जादू केली आहे… रजनीकांत यांना मनापासून शुभेच्छा!”. तर मामूथी यांनी लिहिलं आहे की, रजनीकांत यांना ५० वर्ष अभिनय क्षेत्रात पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा… तुमच्यासोबत स्क्रिन शेअर करायला मिळणं ही माझ्यासाठी फार मोठी संधी होती… कुली या तुमच्या आगामी चित्रपटासाठी खुप शुभेच्छा”.

तर, कमल हासन यांनी देखील आपल्या मित्राला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत… शिवाय कुली चित्रपटाला विशेष शुभेच्छा देत आमिर खान, श्रुती हासन यांच्याही कामाचं कौतुक केलं आहे…
तसेच, रजनीकांत यांना शिवकार्तिकेयन, ह्रतिक रोशन, अनिरुद्ध अशा हिंदी आणि साऊथ मधल्या कलाकारांनी शुभेच्छा देत त्यांच्या कामाचं आणि ५० वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुकही केलं आहे…

दरम्यान, लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केलेला कुली चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाला असून यात रजनीकांत यांच्यासोबत आमिर खान, शोबिन शाहिर, नागार्जून, उपेंद्र राव, श्रुती हासन, पुजा हेगडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात २५ कोटींच्या पुढे गल्ला सध्या तरी जमवला आहे… देशभरात ९०३ स्क्रिन्सवर सुरु असणारा कुली हा तमिळ चित्रपट १००० कोटी कमावणार का याकडे आता सगळ्याचं लक्ष लगालं आहे…
================================
हे देखील वाचा : Johny Lever : धारावी ते बॉलिवूड इंडस्ट्री प्रवास करणारं हसरं व्यक्तिमत्तव…!
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi