
‘मन धावतंया’ फेम राधिका भिडेची नवी इनिंग; ‘ उत्तर’ मधून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण!
सध्याचा भारतभर गाजणारा, तरूणाईचा लाडका मराठमोळा आवाज म्हणजे राधिका भिडे, जिच्या ‘मन धावतंया’ या गाण्याने लाखो हृदयं जिंकली आहेत. तिच्या गाण्यांमध्ये असलेली ऊर्जा आणि भावना प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. याच राधिकाने आता पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले आहे.तिने गायलेलं पहिलं मराठी चित्रपट गीत “हो आई!” सध्या चांगलंच व्हायरल होतंय. “उत्तर” या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या प्रमोशन गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री आणि गोड आपुलकीचे दर्शन घडतंय.(Singer Radhika Bhide)

“हो आई!” या गाण्यात आई आणि मुलाच्या नात्यातील गोडाई आणि ते जिव्हाळ्याचं भावनिक संबंध फारच सुंदर पद्धतीने व्यक्त करण्यात आले आहेत. गाण्याच्या बोलांमध्ये ‘तू आहेस म्हणून मी आहे’ या भावनेला प्रगल्भतेने सादर केलं आहे. गोड चालीत आणि सोप्या शब्दांत साकारलेलं हे गाणं आईबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रेरणादायक ठरतं. राधिका भिडेच्या सुमधुर आवाजात सजलेलं हे गाणं प्रत्येकाला आपल्या आईला “थँक यू” म्हणण्याची संधी देतंय.

‘उत्तर’ चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यानंतर रसिकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या प्रमोशन गाण्यात राधिकाने गायलेलं “हो आई!” हे गाणं त्यातल्या नात्यांच्या गोडाईला आणि त्या प्रेमळ संवेदनांना छान डोकावतं. या गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत, ज्यांनी आधीही अमितराज सोबत “मन धागा धागा जोडते नवा”, “माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं” आणि “तुला जपणार आहे” यांसारख्या सुपरहिट गाण्यांद्वारे रसिकांच्या हृदयात घर केलं आहे. गाण्याची संगीतकार जोडी अमितराज आणि क्षितिज पटवर्धन ही देखील रसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.(Singer Radhika Bhide)
=============================
=============================
‘उत्तर’ हा चित्रपट झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त निर्मिती अंतर्गत तयार होत आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, आणि ऋता दुर्गुळे यांची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचे निर्माते उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर, मयूर हरदास, आणि संपदा वाघ हे आहेत. चित्रपट “उत्तर” झी स्टुडिओजच्या माध्यमातून १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना एक गोड आणि प्रेरणादायक अनुभव मिळणार आहे.