Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!
चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende) चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला… कुख्यात चोर चार्ल्स शोभराज(Charles Shobhraj) याला दोनदा जेरबंद करणाऱ्या इन्सपेक्टर मधुकर झेंडे यांची गोष्ट या चित्रपटात दिखवली आहे… कशाप्रकारे त्यांनी हुशारीने चार्ल्सला पकडलं होतं हे या चित्रपटात दाखवलं असून इन्सपेक्टर झेंडेंची भूमिका अभिनेते मनोज बाजपेयी यांनी केली आहे… तसेच, त्यांच्या सोबत या चित्रपटात बरेच मराठी कलाकार असून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून त्यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे… या चित्रपटात भाऊ कदम यांनी मनोज बाजपेयींसोबत स्क्रीन शेअर असून बाजपेयींनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाऊचं भरभरुन कौतुक केलं आहे. भाऊकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं मनोज वाजपेयीने म्हटलं आहे. (Entertainment News)

मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) मुलाखतीमध्ये म्हणाले की, “भाऊ कदमला मी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहिलं होतं. या चित्रपटामुळे मला भाऊ कदमकडून खूप काही शिकायला मिळालं. शूटिंगमधझ्ये ते नेहमी आमच्यासोबत असायचे. असं वाटतं की ते काही बोलत नाहीत गप्प असतात. त्यामुळे त्यांची तयारी दिसत नाही. पण ते एक असे अभिनेता आहेत ते जितका वेळ शूटिंगमध्ये असतात. त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतं. एकाच डायलॉगचे खूप व्हर्जन ते तयार करून बघतात. ते इतके शांत आहेत की आजूबाजूच्या कोणालाच कळत नाही. सगळ्यांना असं वाटतं की ते आले आणि डायलॉग बोलले. पण, ते खूप विचार करत असतात. ते त्यांच्या कामाकडे खूप गंभीररित्या पाहतात. ते उभे राहिले आणि लोक हसायले लागले असं होत नाही. भाऊ कदम खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे”…(Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !
=================================
दरम्यान, ‘इन्सपेक्टर झेंडे’ या चित्रपटाची निर्मिती ओम राऊत यांनी केली आहे… या चित्रपटात मनोज बाजपेयींसोबत भाऊ कदम, हरीश दुधाडे, ओंकार राऊत हे मराठी कलाकार आहेत… तसेच, चार्ल्स शोभराजची भूमिका जीम सर्भ याने साकारली आहे…(Inspector Zende Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi