
Manoj Kumar : ‘शहीद’च्या पुरस्काराची रक्कम भगतसिंग यांच्या कुटुंबियांना देऊ केली!
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं ४ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कलासृष्टीवर शोककळा पसरली असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपसृष्टीच्या कारकिर्दित बरेच देशभक्तीपर चित्रपट केले, त्यातील पहिला चित्रपट म्हणजे ‘शहीद’ (Shahid). १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ या चित्रपटात त्यांनी क्रांतीकारी भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. विशेष म्हणजे, मनोज कुमार यांनी या पुरस्काराची संपूर्ण रक्कम भगत सिंग यांच्या कुटुंबीयांना दान केली होती.(Bollywood untold stories)

मनोज कुमार (Manoj Kumar) अभिनित ‘शहीद’ हा चित्रपट एस. राम शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात मनोज कुमार यांच्यासोबत कामिनी कौशल, प्राण, प्रेम चोप्रा (Prem Chopra), मनमोहन, मदन पुरी आणि करण दीवान असे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाबद्दल मनोज कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “मी ‘शहीद’ चित्रपटासाठी मिळालेली राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण रक्कम भगत सिंग यांच्या कुटुंबीयांना दान केली. पुरस्कार मिळाल्याने कोणत्याही कलाकाराला समाधान मिळतेच आणि ते मी त्यांना देऊ केले. आणि ‘शहीद’मधील माझ्या कार्याची सरकारने दखल घेतल्याचा मला आनंद आहे.”(Bollywood update news)

मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी १९५७ मध्ये ‘फॅशन’ चित्रपटात छोटासा रोल केला.. त्यानंतर १९५८ मध्ये ‘सहारा’, १९५९ मध्ये ‘चांद’ अशा चित्रपटांमध्ये लहान-सहान भूमिका केल्यानंतर प्रमुख अभिनेता म्हणून १९६१ साली ‘काच की गुडिया’ या चित्रपटातून ते समोर आले आणि त्यानंतर त्यांनी कधी लिड रोल सोडलाच नाही… ‘अनिता’, ‘अमानत’’, ‘कलयुग और रामायण’, ‘दस नंबरी,’पंचायत’, ‘पिकनिक’, ‘पूरब और पश्चिम’, ‘वौ कौन थी’, ‘पेहचान’, ‘यादगार’, ‘नील कमल’, ‘गुमनाम’, ‘मा बेटा’ असे अनेक अजरामर चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले…(Manoj Kumar movies)
४० वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं ८७व्या वर्षी निधन झालं.. जाणून घेऊयात शहीद चित्रपटाचा किस्सा…