Sidharth Khirid : अखेर सिद्धार्थ खिरीडने हटके कॅप्शन देत शेअर केला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो
सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नाचे वारे वाहत आहे. रेश्मा शिंदे, किरण गायकवाड, अभिषेक गावकर, शाल्व किंजवडेकर, हेमल इंगळे आदी अनेक कलाकारांनी नुकतीच लगीनगाठ बांधली. मात्र ही यादी इथेच संपलेली नाही २०२५ या नवीन वर्षात अजूनही अनेक कलाकार लग्न करणार आहेत. (Sidharth Khirid)
अशातच काही दिवसांपूर्वीच ‘फ्रेशर्स’ मालिका फेम सिद्धार्थ खिरीडने (Sidharth Khirid) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. २०२४ या वर्षाला निरोप देताना त्याने २०२४ वर्षाचा शेवट गोड करताना ‘Single अध्याय संपला’ म्हणत त्याच्या रिलेशनशिपची कबुली देणारी एक पोस्ट शेअर केली. (Marathi Entertainment Industry)
नवीन वर्षात पदार्पण करताना सिद्धार्थने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्याची ही पोस्ट कमालीची व्हायरल झाली. त्यानंतर सगळीकडे मात्र एकच चर्चा होती, आणि ती म्हणजे सिद्धार्थची मिस्त्री गर्ल नक्की आहे तरी कोण? कारण सिद्धार्थने प्रेमाची कबुली देणाऱ्या पोस्टमध्ये गर्लफ्रेंडचे पाठमोरे फोटो शेअर केले होते. अनेकांनी बऱ्याच नावांचा अंदाज बांधला होता. मात्र आता खुद्द सिध्दार्थनेचं त्याच्या मिस्त्री गर्लचं नाव जाहीर केले आहे. (Marathi Actor)
सिद्धार्थने अजून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल माहिती देत तिचा चेहरा देखील शेअर केला आहे. सिद्धार्थच्या होणाऱ्या पत्नीचे नाव मैथिली (Maithili) असे आहे. सिद्धार्थने त्याच्या गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाइलने प्रपोज करत मैथिलीबरोबरचा फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Entertainment mix masala)
सिद्धार्थने त्याच्या या नवीन पोस्टमध्ये लिहिले, “दोन हृदयं, दोन देश, दोन व्यवसाय… आणि एक निरंतर प्रेमकथा. पूर्ण प्रपोजल व्हिडीओ लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, हे सर्व अगदी परिकथेप्रमाणे आहे”. यासोबतच सिद्धार्थने पुढे ‘She Said Yes’, ‘India To Canada’ असे हॅशटॅग्ज देखील दिले आहेत.
अभिनेता सिद्धार्थ खिरीड हा ब्युटीक्वीन अर्थात सौंदर्यवती डॉ. मैथिली भोसेकरच्या (Maithili Bhosekar) प्रेमात आहे. ती व्यवसायाने डॉक्टर अर्थात डेंटीस्ट असून, तिला मॉडलिंगची आवड आहे. मैथिलीने अमेरिकेतील फ्लोरीडा इथे संपन्न झालेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. यासोबतच ती पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा झळकली आहे. तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.
============
हे देखील वाचा : Omkarnath Thakur: ‘या’ हुकुमशहाच्या निद्रानाशाचा विकार बरा केला संगीतकाराने !
============
मैथिली मुळची डोंबिवलीची असून ती सध्या कॅनडामध्ये राहते. सिद्धार्थ आणि मैथिली अनेक वर्षांपासून लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. सिद्धार्थने नुकतेच मैथिलीला गोव्यातील एका समुद्र किनारी अतिशय रोमॅंटिक आणि खास पद्धतीने प्रपोज केले. याचा एक छानसा व्हिडिओ सिद्धार्थ लवकरच शेअर करणार आहे.
दरम्यान सिद्धार्थबद्दल बोलायचे झाले तर, तो प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता असून, त्याने अनेक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच सिद्धार्थला डान्स देखील खूपच आवड आहे. त्याचे बरेच डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.