Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Alka Kubal मुलगी पायलट असलेल्या विमानाने अलका कुबल यांनी केला प्रवास, शेअर केला खास फोटो
मराठी (Marathi) मनोरंजनविश्वात आजवर अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री (Actress) होऊन गेल्या. प्रत्येक अभिनेत्रीने तिची एक वेगळी ओळख तयार केली आणि ती जपली देखील. याच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (Alka Kubal). अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील मोठ्या आणि अतिशय लोकप्रिय (Popular) अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. (Alka Kubal Daughter Ishani)
अलका कुबल यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. गेली जवळपास तीन दशकांहून (Three Decade) अधिक त्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहेत. एक गुणी, सोज्ज्वळ आणि सोशिक सून म्हणून त्या घराघरांमध्ये प्रसिद्ध आहेत. आजही त्या सिनेसृष्टीत सक्रिय असून, अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये (Daliy Soap and Movie) आपल्याला काम करताना दिसतात.
एवढंच नाही तर अलका कुबल या सोशल मीडियावरही (Social Media) कमालीच्या सक्रिय आहेत. त्या अनेकदा विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत लाईफ अपडेट (Life Update) त्यांच्या फॅन्ससोबत शेअर करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट देखील नेहमीच त्यांना लाइमलाईट्मधे आणतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या लेकीसोबतची एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत असून, गाजत आहे.
अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशानी (Ishani Athalye) पायलट (Pilot) झाली असून, सध्या ती एका कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करत आहे. अलका कुबल यांनी तिच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. अलका कुबल यांनी नुकताच त्यांची लेक ईशानी पायलट असलेल्या विमानाने प्रवास केला. (Alka Kubal Travled By Daughter Ishanis Plane)
याच अतिशय खास प्रवासाची पोस्ट अलका कुबल यांनी शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लेकीबरोबरचा फोटो (Photo) शेअर करत कॅप्शनमध्ये, “आजच्या फ्लाइटसाठी माझी कॅप्टन” असे लिहिले आहे. या फोटोमध्ये दोघींच्या चेहऱ्यावरचा भरपूर आनंद आणि अलका कुबल यांच्या चेहऱ्यावर कौतुक आणि अभिमान (Proud) स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान अलका कुबल यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनी कमेंट्स करत ईशानीचे कौतुक केले आहे. ईशानीला लहानपणापासूनच विमानाचे मोठे वेड होते. म्हणूनच तिने या क्षेत्रात करियर निवडले आणि ती पायलट झाली.
अलका कुबल यांना दोन मुली आहेत. मात्र या दोघीनी सिनेसृष्टीपासून दूर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.मुख्य म्हणजे त्या ज्या क्षेत्रात काम करत आहेत, तिथे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत नावलैकिक कमावला आहेत.
हे देखील वाचा : ‘माहेरची साडी’ नंतर काय? उत्तर मिळाले हो…
अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये (Sameer Athalye) यांची मुलगी असलेल्या ईशानीने घरात चित्रपटाचा वारसा असताना देखील करियरसाठी दुसरे क्षेत्र न निवडले. तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करत मोठे यश मिळवले आणि उंच भरारी घेतली आहे. ईशानीकडे वैमानिकाचे “लाइफटाइम लायसन्स” (Lifetime Pilot License) आहे. ईशानी ही विवाहित (Married) असून निशांत वालिया (Nishant Walia) असे तिच्या पतीचे नाव आहे.
अलका आणि समीर आठल्ये या दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यांची दुसरी मुलगी कस्तुरी (Kasturi Athalye) डॉक्टर (Doctor) असून तिने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षेत यश मिळवले आहे. तिने फिलिपाइन्समधून (Philippines) एमबीबीएस (MBBS) केले असून, ती डर्मिटोलॉजिस्ट (Dermatologist) आहे.