
Dulquer Salmaan सोबत झळकली संभाजी नगरमधील ही मराठमोळी अभिनेत्री!
केवळ भारतातच नाही तर पॅन इंडिया स्टार्समध्ये ज्या साऊथ सुपरस्टारची गणना केली जाते अशा दुलकर सलमानचा नवा चित्रपट ‘कंथा’ (Kantha) सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे…. साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडलाही आपल्या अभिनयाची भूरळ घालणाऱ्या दुलकर सलमान सोबत त्याच्या नव्या चित्रपटात महाराष्ट्राच्या संभाजी नगरची अभिनेत्री झळकली आहे…कोण आहे ती जाणून घेऊयात… (Dulquer Salmaan Movies)

१४ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘कंथा’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती…बॉक्स ऑफिसवर यशस्वीपणे आपलं स्थान निर्माण करणाऱ्या या चित्रपटात राणा दग्गुबत्ती आणि दुलकर सलमान प्रमुख भूमिकेत आहेत… तसेच, त्याच्यासोबत संभाजी नगरमधील मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसे झळकली आहे… . उत्कृष्ट अभिनेता असणाऱ्या दुलकर सलमानची ‘वेल्फेअर फिल्म्स’ आणि राणा दग्गुबातीची ‘स्पिरिट मीडिया’ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Bhagyahsree Borse Movies)
================================
हे देखील वाचा : Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील; कारण…
================================
भाग्यश्री बोरसे हिचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला… तिच्या जन्मानंतर काही वर्षात तिचं कुटुंब नायजेरियाला शिफ्ट आणि वडलांना नोकरी लागल्यामुळे संपूर्ण कुटुंब तिथे स्थायिक झालं… भाग्यश्रीने नायजेरियातील ‘लेगोज’शहरात शालेय शिक्षण घेतलं… सात वर्ष नायजेरियात राहिल्यानंतर ती मुंबईत आली आणि इथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली… शिक्षण घेत मॉडलिंग करणाऱ्या भाग्यश्री हिला काही जाहिरातींमध्ये संधी मिळाली… आणि त्यानंत ‘यारियां’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटांमध्ये तिने काम केलं… (South Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi