Pushpa 2 पुष्पा २ सिनेमात जोडले जाणार बोनस फुटेज, ‘रीलोडेड’ नावाने
प्राजक्ता माळी झाली ‘लालछडी’ शेअर केले आकर्षक फोटो
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून सतत तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
नुकतेच प्राजक्ताने तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील अतिशय सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत असून, नेटकऱ्यांनी देखील तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
प्राजक्ताने या रेड ड्रेसवर रेड रंगाची लिपस्टिक कॅरी केलेली दिसत आहे. सोबतच तिने ग्लॅसी मेकअप करून तिने हा लुक पूर्ण केला आहे.
या रेड ड्रेसवर प्राजक्ताने लाल रंगाचे कानातले घातले आहे. यावेळी तिने केसात बो कॅरी केला आहे.
प्राजक्ताने हे सुंदर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “यावेळी कधी नव्हे ते छान #collerbones दिसायला लागलेत. कधी नव्हे ते #jawline यायला लागली. कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलय आणि आजूबाजूचे म्हणायला लागलेत; एवढी बारीक नको होऊस..,आणि मला तर वजन ५० करायचंय. आत्ता ५१ आहे. म्हटलं Insta family आणि महाराष्ट्राला विचारूया, तुम्हाला काय वाटतं. प्राजक्ता तुम्हांला कशी आवडते? कमेंट्समध्ये नक्की सांगा
१- वजन ५१ ok आहे.
२- वजन ५० कर.
३- वजन ५३ with #chubbycheeks.”
दरम्यान सध्या प्राजक्ता तिच्या ‘फुलवंती’ या सिनेमामुळे कमालीची गाजत आहे. तिच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शिवाय या सिनेमाच्या निमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे.