
Tejaswini Lonari : अभिनयापाठोपाठ अभिनेत्री झाली बिझनेस वुमन!
गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच स्वत:चे स्वतंत्र व्यवसायही सुरु केले आहेत. काही कलाकारांनी हॉटेल काढलं आहे तर काही कलाकारांचं कपड्याचे व्यवसाय आहेत. अशाच एका मराठी अभिनेत्रीने अभिनयापाठोपाठ प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे.. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात… (Marathi actress turns businesswomen)
आत्तापर्यंत मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री अक्षया देवधर, श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे यांच्या पाठोपाठ तेजस्विनी लोणारी हिने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं असून स्वत:च प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस २’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेल्या तेजस्विनीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरू करत निर्मिती क्षेत्रात नवं पाऊल ठेवलं केलं आहे. (Entertainment news)

तेजस्विनीने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचं नाव ‘तेजक्राफ्ट प्रोडक्शन’ असं ठेवलं आहे. तसेच पोस्ट लिहित तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिलं आहे की,“आज एक खास दिवस, एक खास क्षण आणि माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण… मी माझ्या TejKraft Production चा लोगो लॉन्च करत आहे! हा एक मोठा टप्पा आहे, एक स्वप्न साकार होत आहे, आणि यामागे खूप मेहनत, जिद्द आणि समर्पण आहे. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं! आशा आहे की तुम्ही सगळे माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असाल, साथ द्याल आणि हा सुंदर क्षण माझ्याबरोबर साजरा कराल. धन्यवाद आणि चला, हा प्रवास एकत्र एन्जॉय करूया!” (Tejaswini lonari production house)
===========================
हे देखील वाचा : Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!
===========================
तेजस्विनीने मालिकांसह मराठी चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. यात‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘गुलदस्ता’, ‘अफलातून’ अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. इतकंच नव्हे तर‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात देखील ती सहभागी झाली होती. त्यामुळे अभिनयानंतर निर्मिती क्षेत्रात तिने टाकलेलं पाऊल यशस्वी होईल अशा शुभेच्छा तिला कलाकार आणि तिच्या मित्र परिवाराकडून दिल्या जात आहेत. (Marathi film industry)