Susheela-Sujeet : बाल्कनीमधून ‘सुशीला-सुजीत’ का ओरडत आहेत हे लवकरच कळणार!

Urmila Kothare अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात, एकाच मृत्यू
मराठी (Marathi) मनोरंजनविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या (Actress Urmila Kothare) गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ (Poiser Metro Station) ही घटना घडली. काल शुक्रवारी (२७ डिसेंबरला) घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Urmila Kothare )
या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रोमध्ये काम करणाऱ्यांना दोन मजुरांना उडवलं. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे. तसेच उर्मिला आणि तिच्या चालकालाही दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. (Social News / Updates)
उर्मिला तिच्या शूटिंगवरून परत येत असताना हा अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. उर्मिलाचा ड्रायव्हर कार चालवत होता. ड्रायव्हरचे त्याच्या गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी उर्मिलाच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. (Entertainment mix masala)

याप्रकरणी समता नगर पोलीस (Samata Nagar Police Station) ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा आणि तिच्या ड्रायव्हरचा जीव वाचला. तिच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एक व्हिडीओमध्ये कारच्या दर्शनी भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान या अपघातानंतर उर्मिला किंवा तिच्या घरच्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे उर्मिलाला या अपघातामध्ये किती मार बसला आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. आता या प्रकरणावर, अपघातांवर कानेटकर किंवा कोठारे यांच्या परिवारातून माहिती दिल्यावरच पुढील माहिती समजेल.
दरम्यान, अभिनेत्री उर्मिला कोठारे ही मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांची सून आणि अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांची पत्नी आहे. उर्मिला कोठारे ही काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेच्या निमित्ताने तिने १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते.