
Movies 2025 : मराठी चित्रपटांची मराठीसोबतच लढत!
एप्रिल-मे महिना आला की सगळ्यांनाच सुट्टीचे वेध लागतात… कधी-कधी ऑफिसमधून सुट्टी मिळाली नाही तर दांडी मारुन मित्रांसोबत पिक्चर पाहायलाही काही जणं जातात.. त्यामुळे हौशीने चित्रपट पाहायला जाणाऱ्यांसाठी पुढचे काही आठवडे खास असणार आहेत.. एकीकडे प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची मेजवानी वाट पाहात आहे तर दुसरीकडे मराठी चित्रपटांची एकमेकांशीच आणि मराठीची हिंदी चित्रपटांशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.. आता याचा चित्रपटाच्या कमाईवर काय परिणाम होणार थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात…(Marathi and hindi films)
तर.. एकीकडे मराठी चित्रपट उत्तम येत नाहीत अशी तक्रार करणाऱ्यांसाठी आगामी काळात एकाहून एक तुफान चित्रपट वाट पाहात आहेत..बरं.. मराठीसोबत हिंदी चित्रपटही एकाच दिवशी रिलीज होणार आहेत.. आधी जाणून घेऊयात त्याबद्दल…(Bollywood)

१८ एप्रिल २०२५ रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘सुशीला सुजीत’ हे दोन मराठी चित्रपट एकमकांसमोर येणार आहेत तर त्यांची टक्कर अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ (Kesari chapter 2) सोबत होणार आहे… यानंतर २५ एप्रिल २०२५ रोजी ‘देवमाणूस’, ‘झापुक झुपूक’ चित्रपट रिलीज होणार असून प्रतिक गांधीच्या फुले, सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि इम्रान हाश्मीच्या ‘ग्राऊंड झिरो’ (Ground Zero) यांच्यासोबत त्यांचा सामना होणार आहे. (Entertainment tadaka)

यानंतर मे महिन्यात ‘आता थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ (Gulkand) हे चित्रपट १ मे २०२५ रोजी रिलीज होणार असून त्यांचा सामना अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या ‘रेड २’ (Raid 2), संजय दत्तच्या ‘द भूतनी’ (The Bhootni) आणि तेलुगु चित्रपट ‘हिट : द थर्ड केस’ (HIT : The third case)( सोबत होणार आहे. त्यानंतर ९ मे रोजी चक्क ४ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत यात ‘पीएसआय अर्जुन’ (PSI Arjun), ‘छबी’, ‘माझी प्रारतना’, ‘शातिर’यांचा समावेश असून राजकूमार रावच्या ‘भूल चूक माफ’ (Bhool Chuk Maaf) सोबत आमना-सामना होणार आहे.

आणि शेवटी १६ मे २०२५ ला ‘एप्रिल मे ९९’, ‘बंजारा’, ‘अमायरा’ चित्रपट रिलीज होणार असून सुदैवाने या दिवसी एकही मोठा हिंदी चित्रपट रिलीज होणार नसल्यामुळे याच तीन मराठी चित्रपटांची एकमेकांशी स्पर्धा लागणार आहे…(Bollywood tadaka)
===============================
हे देखील वाचा: Astad Kale : ‘छावा’ वाईट चित्रपट; स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्तादचं धक्कादायक मत!
===============================
मराठीची-मराठीशीच लढत…
येत्या दीड महिन्यात खरं तर १३ मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत ही आनंदाची बाब नक्कीच आहे पण याचा बॉक्स ऑफिसवर कसा थोडा परिणाम होण्याची शक्यता देखील वाटते… प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी जरी मिळणार असली तरी एकाच दिवशी २ किंवा ३ मराठी चित्रपट रिलीज करुन आपल्याच चित्रपटांना झाकोळलं जात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. शिवाय, एप्रिल – मे महिन्याचा काळ हा जसा सुट्टीचा आहे तसंच आयपीएल मॅचमुळे देखील मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील का हा प्रस्न नकळतपणे आपल्यासमोर उभा करतोच. (Marathi upcoming films)

प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्वाचा…
आपल्या माणसांसोबत healthy competition असावं असं म्हटलं जातं पण त्या स्पर्धेत आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी हा सल्लाही दिला जातोच. आगामी काळात मराठी चित्रपटांची रांग जरी लागली असली तरी प्रेक्षक नेमकी कोणत्या चित्रपटांना अधिक प्रतिसाद देणार हे पाहणं खरंच फार महत्वाचं आहे. कारण, मराठी मेकर्स, लेखक, कलाकार उत्तम चित्रपट घेऊन येत नाहीत अशी तक्रार करणाऱ्या प्रेक्षकवर्गासाठी एकामागून एक इतके दर्जेदार चित्रपट जर का कलाकार घेऊन येत असतील तर ते पाहून त्यावर टिप्पणी करावी अशी अपेक्षा नक्कीच आहे… कलाकृती न पाहता त्यावर कुणीतरी सोशल मिडियावर लिहिलेलं समीक्षण वाचून चित्रपट चांगला की वाईट हे घरबसल्या ठरवण्यापेक्षा प्रेक्षकांनी मराठी चित्रपट थिएटरमध्येच जाऊन पाहिला पाहिजे आणि हिच काळाची गरज आहे… (Entertainment news)
===============================
हे देखील वाचा: Mandira Bedi : अभिनय ते फॅशन… मंदिराच्या करिअरवर टाकूयात एक नजर!
===============================
ओटीटीचा परिणाम…
आता दुसरी महत्वाची बाब म्हणजे, १८ एप्रिस ते १६ मे या काळात तसे फार बिग बजेट हिंदी चित्रपट थिएरमध्ये प्रदर्शित होत नसले तरी ओटीटी वाहिनी वर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट किंवा वेब सीरीजचा परिणामही मराठी चित्रपटांवर होऊ शकतो ही शक्यता डावलून चालणार नाही… शिवाय, ओटीटीवरील मल्याळम, तेलुगु, कन्नड या भाषांमधील सस्पेन्स, थ्रिलर आणि मिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांना अधिक आकर्षित करत असल्यामुळे प्रेक्षकांचा कल दिवसागणिक बदलत चालला आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे हे दोन महिने खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी आपली कला सशक्तपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक महत्वाचा काळ आहे असं नक्कीच म्हणावं लागेल..आणि एकाच दिवशी दोन मराठी चित्रपट आणि एखादा तरी हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे नेमका प्रेक्षक कुठल्या चित्रपटाकडे वळणार हे जरा मेकर्ससाठी आव्हानात्मकच ठरणार आहे…(Bollywood upcoming movies 2025)
रसिका शिंदे-पॉल