
दीपाली सय्यद ते सागर कारंडे; Bigg Boss Marathi 6 च्या पर्वातील सदस्यांची यादी!
बऱ्याच महिन्यांपासून ज्या शो ची सगळे वाट पाहात होते तो मराठी बिग बॉस आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘मराठी बिग बॉस’चा हा सहावा सीझन असून यंदाच्या पर्वात काय धमाल येणार? स्पर्धकांच्या नशीबाचा खेळ कसा पालटणार आणि कुणासाठी कोणतं दार उघडणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उस्तुक आहेत. ११ जानेवारी २०२६ पासून बिग बॉसचा सहावा सीझन सुरु झाला असून यंदा कोण-कोणते कंटेस्टंट्स असणार आहेत ते जाणून घेऊयात… (Big Boss Marathi Season 6)
तर, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली आहे. या पर्वात अभिनेत्री आणि राजकारणी दीपाली सय्यद घरात एन्ट्री करणारी पहिली सदस्य ठरली. पुढे ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेनं एन्ट्री घेतली. अभिनेता सचिन कुमावत, अभिनेत्री सोनाली राऊत, ‘लक्ष्मी निवास’ मालिका फेम तन्वी कोलते अभिनेता आयुष संजीव, अभिनेता राकेश बापट अशी इंडस्ट्रीतील लोकं यंदाचं पर्व गाजवणार आहेत. (Deepali Sayed, Sagar Karande)

यांच्यासोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे (Karan Sonawane), गायिका प्राजक्ता शुक्रे, रोडीज गाजवणारी रुचिता जामदार, प्रभु शेळके उर्फ डॉन, अनुश्री माने, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत आणि विशाल कोटियन हे देखील आपला खेळ दाखवणार आहेत. त्यामुळे सहावं सीझन वेगळं ठरणार का? आणि घरातील ८०० खिडक्या आणि ९०० दारांमागे नेमकं काय दडलं आहे याची उत्तर आता हळूहळू आपल्यासमोर येणार आहेत.
================================
हे देखील वाचा : Shiv Thakare लग्न बंधनात अडकला? फोटोमधली ‘ती’ आहे तरी कोण?
================================
दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ बिग बॉस मराठी सीझन ६’ हा १०० दिवसांचा खेळ ११ जानेवारी २०२६ पासून सुरु झाला आहे. सीझन ५ प्रमाणे यंदाही होस्ट अभिनेते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हेच असणार आहेत. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर शनिवार-रविलार कोणाला शाब्बासकी मिळणार? आणि कोणाला ओरडा? हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक अधिक आतुर झाले आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi