Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

सचिनदा आणि Pancham Da : बाप से बेटा सवाई ?

Marathi & Bollywood Movie 2025 : वर्षाच्या अखेरीस ‘हे’ चित्रपट

Coolie बेचाळीस वर्षांचा झाला; या सुपरहिटची गोष्टच वेगळी

Manisha Koirala To Bhagyashree : बॉलिवूडचे हे स्टार्स आहेत राजघराण्यातील

धनुष – क्रितीच्या Tere Ishq Mein ला प्रेक्षकांची पसंती; केली

“उंदरासारखे मोबाईल घेऊन…”; पाराझींबदद्ल Jaya Bachchan स्पष्टच बोलल्या

Vachan Dile Tu Mala मधून अभिनेते मिलिंद गवळी येणार भेटीला;

नवी मालिका ‘Vachan Dile Tu Mala’ लवकरच भेटीला; अनुष्का सरकटे

अभिनंदन! ‘त्या’ चर्चांना लागला पूर्णविराम; Samantha Ruth Prabhu-राज निदिमोरू यांनी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’साठी

 डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’साठी
मिक्स मसाला

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर चषका’साठी

by रसिका शिंदे-पॉल 02/12/2025

डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक क्रिकेटचा संग्राम रंगणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे सामने ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून या स्पर्धेचं आयोजन डोंबिवलीकर संस्थेने केले आहे. हा उपक्रम संपादक, आमदार रविंद्र चव्हाण, (प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) यांच्या डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे.

यंदाच्या चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी घडवणाऱ्या ८ दिग्गज महानुभावांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने संघ बनवण्यात आले आहेत. पहिला संघ निळू फुले संघ असून त्याचा कॅप्टन सिद्धार्थ जाधव आहे. या टीममध्ये नुपूर दुधवाडकर, वरद चव्हाण, ऋषिकेश पाटील, तेजस बर्वे, सुप्रीत कदम, शिव ठाकरे, ऋतुजा लिमये, ऋतुजा कुलकर्णी आहेत तर दुसरा भालजी पेंढारकर संघ आहे. त्याचा कॅप्टन हार्दिक जोशी असून त्याच्या टीममध्ये ऋतुराज फडके, आकाश पेंढारकर, अमोल नाईक, नचिकेत लेले, सौरभ चौगुले, रोहित शिवलकर, कीर्ती पेंढारकर, धनश्री काडगांवकर आहेत. दादासाहेब फाळके संघाचे संजय जाधव कॅप्टन असून माधव देवचक्के, सुजय डहाके, आदिश वैद्य, प्रदीप मिस्त्री, विजय आंदळकर, जगदीश चव्हाण, जयंती वाघधरे, नम्रता प्रधान त्यांच्या टीममध्ये आहेत. चौथा संघ रंजना संघ असून तितिक्षा तावडे त्याची कॅप्टन आहे. तिच्या संघात
सिद्धार्थ बोडके, आशिष कुलकर्णी, प्रणव रावराणे, प्रसाद बर्वे, गौरव घाटणेकर, उमाकांत पाटील, शांतनु भाके, अमृता रावराणे यांचा समावेश आहे.

तर पु. ल. देशपांडे संघाचे कॅप्टन प्रवीण तरडे असून त्यांच्या संघात अभिजीत कवठाळकर, अजिंक्य जाधव, सागर पाठक, विराट मडके, चिन्मय संत, अंशुमन विचारे, राधा सागर आहेत. सहावा संघ दादा कोंडके संघ असून प्रथमेश परब त्याचा कॅप्टन आहे. तर या संघात विजय पटवर्धन, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, रोहन मापुस्कर, विशाल देवरुखकर, कृणाल पाटील, मयुरी मोहिते, संजना पाटील आहेत. व्ही. शांताराम संघाचे कॅप्टन विजू माने असून संदीप जुवाटकर, विनय राऊळ, सुमित कोमुर्लेकर, अभिजीत चव्हाण, महेश लिमये, ओमप्रकाश शिंदे, प्राजक्ता शिसोदे, गौरी इंगवले या संघात आहेत. अखेरचा संघ भक्ती बर्वे संघ असून अनुजा साठे त्याची कॅप्टन आहे. या संघात सौरभ गोखले, वैभव चव्हाण, हर्षद अटकरी, अंगद म्हसकर, अक्षय वाघमारे, आनंद काळे, विशाल निकम, रिया राज सहभागी आहेत.

================================

हे देखील वाचा : “उंदरासारखे मोबाईल घेऊन…”; पाराझींबदद्ल Jaya Bachchan स्पष्टच बोलल्या

================================

दोन दिवस डोंबिवलीत फक्त क्रिकेट, उत्साह, कलाकारांची धमाल आणि मनोरंजनाचा झंझावात पाहायला मिळणार आहे.
मैदानावर कलाकारांची फिल्डिंग, बॅटिंग, चौकार-षटकारांचा वर्षाव आणि एकमेकांमधील मैत्रीपूर्ण टक्कर हे सर्व प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे. प्रत्येक संघ आपल्या नावाशी जोडलेल्या महान दिग्गजांना सन्मान देत मैदानावर उतरणार असल्याने स्पर्धेला भावनिक आणि सांस्कृतिक रंगही मिळणार आहे. ही सर्वात मोठी मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग ठरणार असून ‘डोंबिवलीकर चषका’ची ही रोमांचक लढत प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय पर्व ठरेल, यात शंकाच नाही!

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update dombivli Entertainment marathi celebrity marathi celebrity at dombivli marathi celebrity cricket league ravindra chavhan
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.