
Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने केल विशेष कौतुक!
‘दशावतार’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील लोकप्रिय यूट्यूब रिऍक्शन चॅनल ‘Our Stupid Reactions’ ने या टीझरवर प्रतिक्रिया देत त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. या चॅनलवरील प्रसिद्ध समीक्षक कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल यांनी म्हटलं आहे की, “हा टीझर पाहून वाटतंय जणू आपण एखाद्या हॉलिवूड दर्जाच्या पौराणिक चित्रपटाचा ट्रेलर पाहतोय. मराठी चित्रपट आता अशा भव्य पातळीवर तयार होत असल्याचं पाहून खूपच अभिमान वाटतोय.”(Dashavatar Marathi Movie)

त्यांच्या या रिऍक्शन व्हिडिओमुळे ‘दशावतार‘ हा मराठी चित्रपट जगभरात चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या चॅनलवर चर्चा झालेला ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी आणि कदाचित पहिलाच प्रादेशिक भारतीय चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही एक अभिमानाची बाब ठरते आहे. आपली भाषा आणि कला आता जागतिक स्तरावर पोहोचत आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित हा चित्रपट केवळ भव्य दृश्यांवरच नव्हे, तर कोकणातील निसर्ग, लोककला, परंपरा, मान्यता आणि संस्कृतीचं सुंदर दर्शन घडवतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर घडणारी एक गूढ, रहस्यमय आणि थरारक कथा म्हणजे ‘दशावतार’.

या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन यासाठी सुबोध खानोलकर यांनी केले आहे. निर्मात्यांमध्ये सुबोध खानोलकर, सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांचा समावेश आहे. (Dashavatar Marathi Movie)
==================================
हे देखील वाचा: Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या गाथा !
==================================
अजित भुरे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. ‘दशावतार’ चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे, आणि या भव्य मराठी सिनेमाकडे आता संपूर्ण देशासोबतच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचंही लक्ष लागलं आहे.