Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर; ‘सयाजी शिंदे’ साकारणार विजय तेंडुलकरांची गाजलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका

 मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका
आठवणीतील मालिका

मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका

by मानसी जोशी 20/07/2022

लव्ह ट्रँगल किंवा प्रेमाचा त्रिकोण हा समस्त मनोरंजनसृष्टीचा आवडता विषय आहे. अर्थात प्रेक्षकानांही तो आवडतो किंवा आवडत होता असं म्हणू आपण. कारण सध्याच्या काळात प्रेमाची परिभाषाच बदलून गेली आहे. पण काही म्हणा, एक काळ या अशा कथानकांनी गाजवला आहे. आजही नव्वदच्या दशकात जन्माला आलेली पिढी अशा कथानकांमध्ये रमते, नॉस्टॅल्जिक होते. अशीच एक त्रिकोणी प्रेमकहाणी स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली होती; ती म्हणजे ‘मन उधाण वाऱ्याचे’. (Man Udhan Varyache) 

‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर ‘अगंबाई अरेच्चा’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील “मन उधाण वाऱ्याचे…” हे गाणं तेव्हा प्रचंड लोकप्रिय झालं होतं. मला वाटतं मालिकेला एखाद्या लोकप्रिय गीतातील ओळ वापरायची प्रथा याच मालिकेपासून सुरू झाली असावी. हिंदीमध्ये अर्थातच ही प्रथा आधीच सुरू झाली होती. गेल्या काही वर्षांतील मराठी मालिकांचा विचार केल्यास अनेक मालिकांना एखाद्या जुन्या गीतातील ओळ शीर्षक म्हणून दिलेली आढळेल. 

‘मन उधाण वाऱ्याचे’ ही कहाणी होती गौरी, निखिल आणि नीरजाची. गावात राहणारी साधी, सरळ, अल्लड गौरी. मुंबईमधील एका मोठ्या कुटुंबातील काहीसा अबोल पण समंजस मुलगा निखिल आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी; त्याच्यासाठी जीव द्यायची आणि घ्यायचीही तयार असणारी त्याची प्रेयसी नीरजा. एक साधी, सरळ कहाणी अतिशय रंगतदार पद्धतीने मांडण्यात आल्यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. (Man Udhan Varyache)

सौजन्य – स्टार प्रवाह

निखिल आणि नीरजा दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं. लवकरच दोघंजण लग्नही करणार असतात. निखिल आणि त्यांचा अख्खा ग्रुप पिकनिसाठी एका गावात जातात. परंतु काही कारणांनी नीरजा त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्या गावात गेल्यावर त्यांची ओळख होते गौरीशी. बारावी पास म्हणजे आपण खूप शिकलोय अशा अविर्भावात असणाऱ्या गौरीचं लग्न ठरलेलं असतं. लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडून जास्त हुंडा मागितला जातो आणि गौरीच्या वडिलांची तेवढा हुंडा द्यायची परिस्थिती नसते. गौरीचे वडील वरपक्षासमोर हात जोडून लग्न मोडू नका म्हणून विनंती करत असतात. नेमकं त्याच वेळी निखिल आणि त्याचे मित्र तिथे हजर असतात. 

निखिल साहजिकच या मनोवृत्तीविरोधात बोलतो आणि वरपक्ष लग्न मोडून निघून जातो. निखिलच्या बोलण्यामुळे लग्न मोडलं म्हणून गावकरी त्याला दोषी धरतात आणि गावकऱ्यांच्या दबावामुळे निखिलला गौरीशी लग्न करावं लागतं. निखिल तिच्याशी लग्न करून तिला मुंबईला घेऊन येतो. (Man Udhan Varyache)

यानंतर नीरजाचं दुःख, आकांडतांडव, निखिलच्या घरच्यांची प्रतिक्रिया, भेदरलेली गौरी हे सगळे प्रसंग घडतात. पुढे गौरीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठीची धडपड, शहरी वातावरणात जुळवून घेताना होणारा गोंधळ, निखिल आणि त्याच्या आईची नाराजी, निखिलला मिळविण्यासाठीची नीरजाची कारस्थानं, गौरीचा मेकओव्हर, विरह, त्याग हे सगळे टप्पे यामध्ये दाखवण्यात आले आहेत. 

या साऱ्याच्या जोडीने मालिकेमध्ये काही उपकथानकंही दाखवण्यात आली आहेत. यामध्ये निखिलच्या बालवयातील एका घटनेचं उपकथानकही यामध्ये आहे. ही घटना निखिल आणि त्याच्या आईमध्ये आलेला दुरावा आणि अबोल्याला कारणीभूत असते. ही घटना कुठली हे मात्र मालिकेमध्ये बरेच दिवस एक रहस्य होतं. 

‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमधून कश्यप परुळेकर (निखिल), नेहा गद्रे (गौरी) आणि शर्मिष्ठा राऊत (नीरजा) हे तीन नवीन कलाकार प्रकाशझोतात आले. बहुदा ही या तिघांचीही पहिलीच मालिका असावी. या तिघांव्यतिरिक्त मालिकेमध्ये वर्षा उसगावकर, संजय मोने, अश्विनी एकबोटे, उदय टिकेकर, रुपाली भोसले, दुष्यन्त वाघ, गिरीश ओक, विशाखा सुभेदार इ. कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. मालिकेमध्ये नीरजाची भूमिका आधी निशा शहा ही अभिनेत्री साकारत होती. परंतु सुरुवातीच्या काही भागांनंतर अचानक शर्मिष्ठा राऊतने तिची जागा घेतली. याचं कारण नेमकं काय, हे मात्र तेव्हा कळलं नाही. (Man Udhan Varyache)

========

हे देखील वाचा – अग्निहोत्र: अग्निहोत्राची परंपरा आणि त्यामागच्या रहस्याचा शोध घेणारी मालिका

========

‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका स्टारचेच बंगाली चॅनेल स्टार जलशावरील ‘बौ कोठा काओ’ या बंगाली मालिकेचा रिमेक होती. यानंतर या मालिकेचा हिंदी रिमेक लाईफ ओके चॅनेलवर ‘गुस्ताख दिल’ या नावाने प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेचे निर्माते होते मराठीतील लोकप्रिय कलाकार आणि दिग्दर्शक महेश कोठारे. 

२७ जून २००९ मध्ये सुरू झालेली ही मालिका ऑक्टोबर २०११ पर्यंत यशस्वीपणे चालू होती. माझ्या माहितीत तरी ही मालिका सध्या कुठेच उपलब्ध नाहीये. स्टार प्रवाहवरची मालिका असूनही डिस्ने + हॉटस्टारवरही ही मालिका उपलब्ध नाहीये. त्यामुळे ही मालिका केवळ आठवणीतली मालिकाच बनून राहणार.. (Man Udhan Varyache)

  • 1
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 1
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Kashyap Parulekar Man Udhan Varyache Marathi Serial Neha Gadre
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.