
Mardaani 3 Trailer : ‘कुसूमपूरच्या अम्मा’शी भिडणार शिवानी रॉय; ९३ मुलींच्या अपहरणाचा घेणार शोध!
बॉलिवूड इंडस्ट्रीत गेले ३० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherjee) लवकरच तिच्या डॅशिंग अवतारात परतणार आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा तिसरा भाग ‘मर्दानी ३’ (Mardaani 3) चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. एकीकडे तिच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा राणी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत येत लहान मुलींच्या अपहरणाचा शोध लावणार आहे… (Rani Mukherjee Movies)
राणी मुखर्जी हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच मुलींच्या अपहरणाने होते. त्यानंतर ही केस NIA ऑफिसर शिवानी शिवाजी रॉय हिच्याकडे सोपवली जाते. जेव्हा शिवानीला समजतं की, ३ महिन्यांत तब्बल ९३ मुली गायब झाल्या आहेत, तेव्हा ती या प्रकरणाचा मुळापासून छडा लावत आरोपीला पकडण्याचा मनाशी निर्धार करते.या तपासादरम्यान तिला ‘कुसूमपूरची अम्मा’ हिच्याबद्दल माहिती मिळते. ही अम्मा गरीब घरातील लहान मुलींचं अपहरण करत असते. पण त्यानंतर ती त्यांचं काय करते? हे शोधण्यासाठी शिवानी काय काय करणार आणि तिच्यासमोर सत्य येणार की नाही याचा उलगडा ३० जानेवारी २०२६ रोजी होणार आहे… (Bollywood News 2026)

दरम्यान, यापूर्वी आलेल्या ‘मर्दानी’ मध्ये मानवी तस्करी आणि ‘मर्दानी २’ मध्ये सिरीयल रेपिस्टची मानसिकता दाखवण्यात आली होती. आधीच्या २ भागांप्रमाणेच ‘मर्दानी ३’ ची कथा देखील सत्य घटनांवर आधारित आहे. ‘मर्दानी ३’ मध्ये राणी मुखर्जी नायिकेची तर मल्लिका प्रसाद (Mallika Prasad) खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी आणि ‘द रेल्वे मेन’ फेम आयुष गुप्ता यांनी याचे लेखन केले आहे. (Yashraj Films)
================================
हे देखील वाचा : Rani Mukherjee :‘आती क्या खंडाला….’ या गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
================================
३० वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या राणी मुखर्ला पुन्हा एकदा पोलीस अधिकारी शिवानी रॉयच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षक विशेष उस्तुक आहेत. बॉक्स ऑफिसवर ‘मर्दानी’ आणि मर्दानी २ हिट ठरले होते. त्यामुळे आता ‘मर्दानी ३’ ही लेगसी अबाधित ठेवू शकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. (Mardaani Movie franchisee)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi