‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

स्मृती मंधनाचा होणारा नवरा Palash Muchhal आहे तरी कोण?
सगळीकडे सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत… अशातच भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधनाही (Smriti Mandhana) लवकरच आपली लग्नगाठ बांधणार आहे… बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार पलाश मुच्छलसोबत स्मृती लग्न करणार असून सध्या सोशल मीडीयावर त्यांच्या हळदीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत… क्रिकेटच्या मैदानात स्मृतीला प्रपोज करणारा पलाश मुच्छल सोशल मीडिया सेंसेशन ठरला आहे… स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याची जोरदार चर्चा सुरु असून तो नेमका आहे तरी कोण? त्याची संपत्ती किती आहे? जाणून घेऊयात…

स्मृती मंधना २०१९ पासून बॉलिवूडचा संगीतकार आणि फिल्म मेकर पलाश मुच्छल (Palash Mucchal) यांना डेट करतेय. पलाशने २०१४ च्या ‘ढिश्कियाऊं’ चित्रपटातून कंपोजर म्हणून पदार्पण केलं होतं… पुढे त्याने भूतनाथ रिटर्न्स चित्रपटासाठीही संगीत दिलंय. ‘पार्टी तो बनती है’, ‘तू ही है आशिकी’ या गाण्यांनाही त्यानेच संगीत दिलं आहे…(Palash And Smriti’s Marriage)
================================
================================
म्युजिक कंपोजरसोबतच पलाश अभिनेता देखील आहे… अभिषेक बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘खेलें हम जी जान से’ या चित्रपटात दिसला होता… तर, पलाशची बहीण पलक मुच्छल ही देखील बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका आहे. त्यामुळे सांगलीची स्मृती मंधाना आता मुच्छल कुटुंबाची लवकरच सून होणार असून सर्व स्तरांतून पलाश आणि स्मृती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi