
Trisha Thosar to Srinivas Pokale : ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर नावं कोरणारे ५ बालकलाकार!
नुकताच ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला… भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यात ५ मराठी बालकलाकारांचा समावेश आहे… आनंदाची बाब म्हणजे या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केवळ मराठी बालकलाकारांनीच हे यश संपादित केले आहे… शाहरुख खान, राणी मुखर्जी, करण जोहर, राजकुमार हिरानी, मोहनलाल या कलाकारांसोबत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ५ मराठी बालकलाकारांबद्दल माहिती जाणून घेऊयात…
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारांवर आपली नावं कोरणारे ५ बालकलाकारांची नावं आहेत; त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप, कबीर खंदारे आणि Sukriti Veni Bandreddy. त्रिशा ठोसर (Trisha Thosar) हिला ‘नाळ २’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे… याआधी त्रिशाने महेश मांजरेकर यांच्यासोबत काम केलं असून लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात त्रिशा भार्गव जगतापसोबत झळकणार आहे…

पुढचा बालकलाकार आहे श्रीनिवास पोकळे (Srinivas Pokale). श्रीनिवास याचा हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार असून यंदा ‘नाळ २’ साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे… तसेच, ‘नाळ २’ साठीच भार्गव जगताप यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे…
====================================
====================================
यानंतरचा बालकलाकार आहे कबीर खंदारे (Kabir Khandare)… जिप्सी चित्रपटासाठी कबीरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे… आणि या यादीतील पाचवी बालकलाकार आहे सृक्रिती… ‘गांधी अॅंण्ड चेटू’ (Gandhi and Chettu) या चित्रपटासाठी तिला पुरस्कार मिळाला असून सृक्रिती साऊथ इंडियन दिग्दर्शक सुकुमार यांची कन्या आहे… त्यामुळे यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा फार खास असून दिग्गजांच्या यादीत या ५ बालकलाकारांनी प्रेक्षकांची आणि उपस्थितांची मनं जिंकली… येत्या काळात या बालकलाकारांकडून अधिक उत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळाव्यात याच सदिच्छा!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi