आठवणी बालगंधर्वच्या
परवा बऱ्याच वर्षांनी बालगंधर्व सिनेमा पाहिला.सगळ्या जुन्या आठवणी त्यातील नाट्यसंगीतामधील तानेप्रमाणे गुंजत राहिल्या.
एकदा रसिका मॅडमना नितीन देसाईंचा फोन आला आणि सांगितलं “बालगंधर्वांवर सिनेमा करतोय त्यासाठी ऑफिसमध्ये भेटायला या.” तेंव्हा आम्ही दोघीच इव्हेंट्सची खिंड लढवत होतो. बालगंधर्व सिनेमाच्या प्रोमोशनल इव्हेंट्सची जबाबदारी आम्हाला त्यांनी दिली.
मग आमच्या मिटिंग्ज सुरु झाल्या. सगळे रोज पवईला सकाळी ७ वाजता भेटू लागलो.विशेष म्हणजे सगळे वेळेवर यायचेचं आणि दिवसभर त्या ऑफिसमध्ये धमाल, दंगा, आणि काम. कधी पोट धरून हसलो तर कधी अवाक होऊन गंधर्वांच्या गोष्टी ऐकल्या.खरंच खूप मज्जा होती. समीर दादांचे डेस्कखाली लपवून ठेवलेले वेफर्स, एडिटिंगची शैलेशने सांगितलेली मज्जा, मुंबईत नवीनच आलेल्या सुरभीच्या गोष्टी, प्रमोदने बनवलेल्या Call sheets आणि Excel चे धडे, प्राशिल, राकेशचं सेटचे drawings. मंदार जोशींचे प्रोमोशन संबंद्धीचे वेगवेगळे लेख, पूर्णिमा ताईने आणलेले Costumes, दागिने, Aromas मधला बहारदार breakfast, ऑफिसच्या बाजूचे सगळे फूड जॉइंट्स पालथे घातले होते. कौशल दादा, आदित्य दादाचे किस्से. रवी सर – महेश सर यांची चर्चा. नितीन दादांचं (कुलकर्णी) शांत राहून मिश्किल हसणं, ऑफिसमध्ये सगळ्यांशीच मारलेल्या गप्पा सगळं आजही डोळ्यासमोर उभं राहतं. ND आणि ICPPL अश्या दोन team तिथे काम करत होत्या आणि त्या दोन्ही टीम सांभाळणारी रेश्मा. सिनेमाच्या announcement ची तयारी सुरु झाली.
आणि तो दिवस उजाडला.. १० ऑक्टोबर २०१०. रवींद्रनाट्य मंदिरच्या गेटजवळ खूप मोठ्ठे दीपस्तंभ उभे केले होते. मस्त गालिचा, लिफ्ट आणि पॅसेजमध्ये लाल वेलवेटचे पडदे लावले होते. तोरण, रांगोळी, कंदील, ऑर्गन – तबला, गुलाबाच्या पायघड्या, चाफ्याचा सुगंध, गुलाब पाणी शिंपडलं जात होत. रंगीत कागदामध्ये बांधलेले पेढे, स्वागत करण्यासाठी नऊवारी मधल्या मुली, स्टेजवर बालगंधर्वांच्या मोठ्या फोटो फ्रेम्स होत्या.एकाबाजूला पूजेची तयारी, सर्व पत्रकारांची विशेष देखभाल घ्यायला समीर फडणीस आणि अमृता होतेच. या इव्हेंटची २ दिवस आधी पासून रंगीत तालीम सुरु होती आणि ह्या सगळ्यांना एकत्र बांधणाऱ्या आम्ही दोघी.
कोण-कसं-कुठे उभ राहणार. काय-कधी-केंव्हा बोलणार हे सगळं ठरवलं होत. आणि अतिशय सुंदर कार्यक्रमाची रुपारेषा ठरवली होती. मंगल व भव्य वातावरणाच्या निर्मितीमुळे नाट्यगृहाच चित्र गंधर्व नाटक कंपनी सारखं झालं होतं.
आनंद भाटे ह्यांच्या मधुर नाट्यसंगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुधीर काकांनी (गाडगीळ) जेष्ठ गायिका जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि मान्यवरांचे स्वागत केले. ठरल्याप्रमाणे निर्माते नितीन देसाई, दिग्दर्शक रवी जाधव, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, Costume Designer नीता लुल्ला आणि पूर्णिमा ओक, Make-up Designer विक्रम गायकवाड, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, आदित्य ओक. अभिजित केळकर, सिद्धार्थ चांदेकर, अविनाश नारकर, विद्याधर जोशी, विभावरी देशपांडे, लोकेश गुप्ते, सागर तळाशीकर, स्वानंद किरकिरे, मुकेश ऋषी असे प्रमुख कलाकार, सर्व Technical team स्टेजवर येऊन उभी राहिली आणि ‘’पंचतुंड नररुंडमालधर” नांदीला सुरुवात झाली… मोगऱ्याची फुलं प्रेक्षकांवर उधळली आणि बालगंधर्वांच्या सुरांवर सुबोध दादाची एन्ट्री झाली.
१० वर्ष झाली, कशी गेली कळलंच नाही… त्यानंतर Music Launch, Screening, Premier, Press conferences असे बरेच इव्हेंट्स झाले, हा इव्हेंट जास्त लक्षात राहिला.
खरंतर सिनेमाची announcement होती.पण, एखाद्या छोट्या कार्यक्रमाचा ”Grand Event” कसा करायचा ते शिकले. रसिका कुलकर्णी, ह्या इव्हेंटचा छोटासा भाग तुमच्यामुळे होता आलं. Thank you. आणि खरंच सिनेमामध्ये म्हटल्या प्रमाणे,
असा बालगंधर्व आता न होणे…..
पडद्या मागची कलाकार मी, त्यामुळे साहित्यिक वगैरे लिहिता येत नाही, पण थोडा Lockdown मधला प्रयत्न किंवा परिणाम…!
– अर्पिता कोर्डे