
Kishore Kumar : ‘मेरे मेहबूब कयामत होगी…’ गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील आघाडीचा पार्श्वगायक किशोर कुमार. ते आपल्यातून जाऊन देखील चाळीस एक वर्षे होत आहेत; तरीही आजची तरुणाई त्यांच्या स्वरावर, त्यांच्या गाण्यावर बेहद फिदा आहेत. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला आज देखील रसिकांची प्रचंड दाद मिळते. त्या काळात या गायकाने आपल्याकडे गावे असे प्रत्येक नवीन येणाऱ्या संगीतकाराला वाटत असे. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे किशोर कुमार यांनी गायलेल्या पहिल्या गाण्याचा किस्सा संगीतकार प्यारेलाल यांनी एकदा कार्यक्रमात सांगितला होता. (Kishore kumar memories)

किशोर यांनी एल पी यांच्याकडे एकूण ३९९ गाणी गायली आहेत. (किशोर कुमार यांनी सर्वाधिक ५८८ गाणी आर डी बर्मन यांच्याकडे गायली.) लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे गायलेले पहिलं किशोर कुमार यांचं गाणं कोणतं होतं आणि त्यावेळी नेमक्या काय गमती जमती झाल्या होत्या? हा किस्सा मोठा इंटरेस्टींग आहे. (Bollywood untiold stories)

लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी आधी अनेक संगीतकारांकडे असिस्टंट म्हणून काम करत होती. त्या मुळे किशोर आणि त्यांचा परिचय होता. पहिल्यांदा त्यांना स्वतंत्र चित्रपट संगीतबद्ध करायला मिळाला बाबुभाई मिस्त्री दिग्दर्शित १९६३ सालचा ‘पारसमणी’. हा एक पोशाख जादुई चित्रपट होता. यातील प्रत्येक गाणं प्रचंड गाजलं. ‘मेरे दिल मी हलकी सी’, ‘वो जब याद आये बहुत याद आये’, ‘रोशन तुम्ही से दुनिया’, ‘चोरी चोरी जो तुमसे मिले तो लोग क्या कहेंगे’, ‘हंसता हुआ नुरानी चेहरा ….’ हि गाणी रफी,लता, मुकेश यांनी गायली होती. सिनेमा सुपर डुपर हिट झाला. देशभर सिनेमातील गाण्यांनी मोठी लोकप्रियता हासील केली. पहिल्याच सिनेमात एल पी यांनी यशाचा षटकार ठोकला. त्यामुळे एल पी यांना अनेक चित्रपट ऑफर होऊ लागले.(Laxikant Pyarelal)
================
हे देखील वाचा : Javed Akhtar : अभिनेता धर्मेंद्रने जावेद अख्तरची का माफी मागितली होती ?
================
शांतीलाल सोनी यांचे दिग्दर्शन असलेला ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ हा चित्रपट त्यांना ऑफर झाला. ‘पारसमणी’ या चित्रपटातील गाणी मोहम्मद रफी आणि मुकेश यांनी गायलेली होती. किशोरकुमार त्यांच्या आवडीचा गायक होता. त्याचा स्वर वापरण्याची संधी आता आयती चालून आली होती. ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटात किशोर कुमार यांचाच स्वर वापरायचाच होता. याचे कारण असं होतं की ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटाचा नायकच किशोर कुमारचं होते.(Kishore Kumar movies)

किशोर कुमार यांचा स्वर एलपी यांना पहिल्यापासून आवडतच होता. परंतु त्यांना विचारायचे कसे अशी भीती त्यांना वाटत होती.आपल्यासारख्या नवोदित संगीतकाराकडे ते गातील कां हा प्रश्न होता. पण एकदा भीड चेपून ते एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेले आणि किशोर कुमार यांना भेटले. एल पी म्हणाले, “दादा,खास आपके लिये हमने एक धुन बनाई है .क्या आप गाओगे? हमारे पास आप पहली बार गाने वाले है.अगर आप गाओगे तो हमारे संगीत को चार चांद लग जायेगे’ किशोर कुमार यांनी ती धून ऐकली आणि ते उडालेच. त्यांना ती धून भयंकर आवडली. ते स्टुडिओ भर नाचायला लागले. अक्षरशः लहान मुलांसारखे उड्या मारत ते नाचू लागले आणि गाऊ लागले ‘लक्ष्मीकांतम प्यारेलालम लक्ष्मीकांतम प्यारेलालम… अरे लक्ष्मीकांतम प्यारेलालम! कितनी सुंदर धुन बनाई है लक्ष्मीकांतम प्यारेलालम … अरे वाह वाह लक्ष्मीकांतम प्यारेलालम …!’ किशोर कुमार यांच्यामध्ये एक लहान मूल दडलेलं होतं. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला की ते असे बेभान होऊन नाचत असायचे.या धूनवर आनंद बक्षी यांनी साजेसे शब्द लिहिले. गाण्याची रिहर्सल झाली आणि गाणं रेकॉर्ड झालं.(Bollywood tadaka)
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
या गाण्याचे बोल होते ‘मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी….’ हे गाणं आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे. आज देखील अनेक नवीन कलाकार हे गाणं गात असतात. रियालिटी शो मध्ये देखील या गाण्याला प्रचंड डिमांड आहे. या गाण्याचे मागच्या अनेक वर्षांत आलेले आहेत रिमिक्स आलेले आहेत. ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटात किशोर कुमार यांच्या आवाजात एकूण पाच गाणी होती. ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटात किशोर कुमार यांच्यासोबत कुमकुम ही अभिनेत्री होती. या चित्रपटाला चांगले यश मिळाले. किशोर कुमार आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे हे पहिलं गाणं होतं आणि ते प्रचंड लोकप्रिय ठरले! Kishore kumar songs)