डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

Vachan Dile Tu Mala मधून अभिनेते मिलिंद गवळी येणार भेटीला; साकारणार नामांकित वकीलांची भूमिका !
टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अनिरुद्ध या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा बनवली आहे. दिग्गज अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांच्या साकारलेल्या या पात्राने महाराष्ट्रातील घराघरात आपली छाप सोडली आहे. आता एक नवीन पात्र आणि एक नवा विषय घेऊन मिलिंद गवळी पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील वचन दिले तू मला मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत ते साकारत आहेत हर्षवर्धन जहागिरदार, एक नामांकित वकील, जो आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय आहे.(Vachan Dile Tu Mala)

हर्षवर्धन जहागिरदार हा एक अत्यंत कुशल आणि अनुभवाने भरलेला वकील आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व इतकं बलवान आहे की, स्पर्धेतील इतर वकील त्याच्यापासून घाबरतात. हर्षवर्धन मानतो की, ‘न्याय फक्त सत्याच्या आधारावरच मिळवता येतो असं नाही, तर पैसे देऊन देखील तो विकत घेतला जाऊ शकतो.’ त्याच्या अहंकारामुळे त्याला पराभव कधीही स्वीकारता येत नाही. जेव्हा मालिकेतील नायिका ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हर्षवर्धनच्या विरोधात उभी राहते आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढते, तेव्हा हर्षवर्धनाच्या अहंकाराला धक्का बसतो आणि तिथूनच नवीन संघर्षाची सुरुवात होते.

सीनियर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागिरदार या व्यक्तिरेखेला साकारण्यासाठी मिलिंद गवळी खूप उत्साही आहेत. या भूमिकेविषयी ते बोलताना म्हणाले, “काही वेळाच्या ब्रेकनंतर आता स्टार प्रवाहच्या नवीन मालिकेतील सहभाग घेत आहे. हा ब्रेक मी ठरवून घेतला होता कारण आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्धच्या भूमिकेचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर अजूनही कायम आहे. तो प्रभाव काढणं किंवा विसरणं कठीण आहे, पण तरीही तितक्याच ताकदीचे आणि वेगळे पात्र तयार करण्यासाठी मी आणि स्टार प्रवाहने एकत्रितपणे हा ब्रेक घेतला. ” (Vachan Dile Tu Mala)
=============================
=============================
”हर्षवर्धन जहागिरदार हा एक निष्णात वकील आहे. माझे वडील पोलीस विभागात कार्यरत असल्यामुळे कायद्याची त्यांना खूप चांगली माहिती आहे. त्यामुळे हर्षवर्धनच्या भूमिकेने मला खूप जवळची वाटली. मी वडिलांकडून खूप गोष्टी शिकत आहे. मला विश्वास आहे की, ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल आणि ती त्यांच्यावरही प्रभाव पाडेल.” अस ही ते म्हणाले. नवी मालिका वचन दिले तू मला १५ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.