प्राइम व्हिडिओवर भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली शो सिरीज ठरली ‘मिर्झापूर 3’
मागील सीझनच्या यशाच्या जोरावर मिर्झापूर या लोकप्रिय सिरिजने आपल्या तिसऱ्या सीझनसह नवीन उंची गाठली आहे जी स्थानिक आणि जागतिक स्तरावर हिट झाली आहे. या क्राइम ड्रामाने भारतातील प्राइम व्हिडिओच्या इतिहासात त्याच्या लाँच वीकेंडला सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि मलेशिया सह 85 हून अधिक देशांमध्ये हा शो टॉप 10 लिस्टमध्ये ट्रेंड झाला आहे. मिर्झापूर सीझन 3 च्या यशानंतर प्राइम व्हिडिओ आता या शोच्या सीझन 4 वर काम करत आहे. या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या सीझनला भारत आणि जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. वेब सिरीजचे दमदार कथानक, उच्च दर्जाची सिनेमॅटोग्राफी आणि जबरदस्त अभिनय यामुळे सर्वांनाच या सिरीजने वेज लावले आहे. प्राइम व्हिडिओवर लाँच वीकेंडदरम्यान ही सीरिज १८० हून अधिक देशांमध्ये आणि भारतातील ९८% भागामध्ये पाहिली गेली आहे.(Mirzapur Season 3)
या यशाबद्दल बोलताना प्राईम व्हिडिओचे इंडिया ओरिजिनल्स हेड निखिल मधोक म्हणाले की, ‘ही हॅटट्रिक आहे. अत्यंत लोकप्रिय मिर्झापूर फ्रँचायझी सीझन 3 आपल्या लॉन्च वीकेंडवर प्राइम व्हिडिओ इंडियावर सर्वात जास्त पाहिला जाणारा शो बनला आहे, ज्याने सीझन 2 सह मागील सर्व विक्रम मोडले आहेत. सिरीजच्या पात्रांशी प्रेक्षक किती रिलेट होतात, हे या यशावरून दिसून येतं. लोकप्रिय संस्कृती आणि दैनंदिन संभाषणाचा हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.”
निखिल मधोक पुढे असही म्हणाले की, “ज्या चाहत्यांनी ही सिरीज इतकी आयकॉनिक आणि आवडली आहे अशा चाहत्यांसोबत हे मोठे यश सामायिक करण्यास आम्ही उत्सुक आहोत. एक्सेल मीडिया अँड एंटरटेन्मेंटसोबतची आमची भक्कम भागीदारी आणि कलाकार आणि क्रूच्या मेहनतीशिवाय हे यश शक्य झाले नसते. फॅनबेसची संख्या वाढताना पाहणे आनंद देणारे आहे आणि रोमांचक देखील आहे. प्राईम व्हिडिओमध्ये, आम्ही कथाकथनाच्या सीमा ओलांडण्यासाठी समर्पित आहोत.
एक्सेल मीडिया अँड एंटरटेन्मेंट निर्मित मिर्झापूर सीझन ३ चे दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केले आहे.(Mirzapur Season 3)
=================================
हे देखील वाचा: Tanaav 2 Trailer: अरबाज खान आणि मानव विज यांच्या ‘तनाव 2’चा दमदार ट्रेलर
==================================
या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशु पैन्यूली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, मेघना मलिक आणि मनू ऋषी चढ्ढा यांसारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत. दहा भागांची ही सिरीज आता भारतात आणि जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्राईम व्हिडिओवर प्रसारित केली जात आहे.