
Drishyam : मोहनलालच्या दृश्यम ३ चा फटका अजय देवगणच्या दृश्यमला लागणार?
वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट थिएटरमध्ये आणि ओटीटीवर पाहण्याची प्रेक्षकांना आवड असतेच. रोमॅंटिक, कॉमेडी, हॉरर, हॉरर-कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर अशा विविध धाटणींच्या चित्रपटांची किंवा वेब सीरीजची कायम मागणी असतेच. आणि यापैकीच सर्वोत्कृष्ट सस्पेन्स चित्रपट ठरला होता ‘दृश्यम’. मुळ मल्याळम भाषेतील या चित्रपटात मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आणि त्यानंतर हिंदीत हा चित्रपट साकारत त्यात अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली होती. लवकरच मुळ मल्याळम भाषेतील ‘दृश्यम ३’ चित्रपट येणार असून हा चित्रपट हिंदीतही शुट करणार असे सांगण्यात आले आहे. यामुळे अजय देवगणच्या हिंदी भाशेतील दृश्यम ३वर याचा परिणाम होणार असं चित्र दिसून येत आहे. (Drishyam movie)
मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असणाऱा ‘दृश्यम १’ २०२३ मध्ये आणि ‘दृश्यम २’ २०२१ मध्ये आला होता. आता तब्बल ४ वर्षांनी चित्रपटाचा तिसऱा भाग येणार असून मल्याळम भाषेसह हिंदीतही चित्रपट करण्याचा विचार दिग्दर्शक जितू जोसेफ यांनी केले आहे. मल्याळम भाषेसह हिंदी भाषिक प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, याचा परिणाम अजय देवगणच्या हिंदी adaptation वर होणार असं दिसतंय. (Bollywood news)

अजय देवगणच्या पहिल्या भागाचं म्हणजे’ दृश्यम १’ चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. पण त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी ‘दृश्यम २’ च्या वेळी अभिषेक पाठक यांनी घेतली. खरं तर अजय देवगणचा दृश्यम जरी मल्याळम चित्रपटाचं adaptation असलं तरी आजवर तोच चित्रपट हिंदीत शुट न केल्यामुळे यशस्वी होऊ शकला. मात्र, आता मुळ चित्रपटच दोन भाषेत तयार केला गेला तर मात्र अजयच्या ‘दृश्यम ३’ वर संकट नक्कीच येऊ शकेल.(Malayalam adaptation movies)

एकीकडे अभिनेते मोहनलाल (Mohanlal) ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) च्या चित्रकरणाची, कथेची तयारी करत आहेत तर दुसरीकडे अजय देवगण ‘धमाल ४’ (Dhamal 4) च्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे ‘दृश्यम ३’ अजयला करण्यासाठी ऑक्टोबर उजाडणारच. पण त्यापूर्वीच जर का मल्याळं आणि हिंदीत मोहनलाल यांचा ‘दृश्यम ३’ आला तर अजय देवगण तिसरा भाग हिंदीत करणार का हा फार महत्वाचा प्रश्न सध्या उभा राहिला आहे. (Ajay Devgan and drishyam movie)

हिंदी दृश्यममध्ये अभिनेते कमलेश सावंत यांनी इन्सपेक्टर गायतोंडेची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी दृश्यम नेमका कुणामुळे घडला याबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले की, “निशिकांत कामत यांच्यामुळेच दृश्यम घडला… “ ‘दृश्यम’ चित्रपटातील गायतोंडे या भूमिकेसाठी ऑडिशन मुंबई, गोवा, पुणे आणि कोल्हापूरात झालं. निशिकांत कामत यांच्या सोबत काम करण्याची संधी मला १९९८ पासून मिळाली होती. त्यामुळे एक नट म्हणून मी काय करु शकतो आणि काय नाही करु शकत याची जाणीव निशिकांत कामत यांना होती. आणि मुळात त्यांचा अट्टहास होता की ते दिग्दर्शित करत असलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटात मी सबइन्सपेक्टर कमलाकर गायतोंडे ही भूमिका साकारावी. पण माझी स्टार प्रवाह वाहिनीवर लक्ष्य ही पोलिसांचीच एक मालिका सुरु असल्यामुळे मला तो चित्रपट करण्यात अडचण येत होती. पण कालांतराने अडचणी दुर झाल्या आणि मी ऑडिशन देऊन आल्यानंतर १०-१२ दिवसांत मला एक फोन आला आणि मला सांगितलं की गायतोंडे तुम्ही करत आहात. आणि अशाप्रकारे निशिकांत कामत यांचा माझ्या कामावरील विश्वास यशस्वी छरला आणि मला दृश्यम चित्रपटाचा भाग होता आलं”, असा किस्सा सांगत कमलेश यांनी त्यांच्या वाट्याला दृश्यम चित्रपट आणि गायतोंडे भूमिका कशी आली त्याबद्दल सांगितले.
रसिका शिंदे-पॉल