
Mufasa: The Lion King OTT Release: आता घरात ही घुमणार मुफासाची गर्जना; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकाल हा सिनेमा
Mufasa: The Lion King: जर तुम्ही मुफासा : द लायन किंग (Mufasa: The Lion King) चित्रपटगृहात पाहिला नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. आता तुम्ही मुफासाचा प्रवास घरबसल्या आरामात अनुभवू शकता. ओटीटी प्लॅटफॉर्मने चित्रपटाच्या ओटीटी प्रीमियरची तारीख ही जाहीर केली आहे. ‘मुफासा’ चित्रपटाला नेहमीच भारतीय प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. जर ‘मुफासा : द लायन किंग’ हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण तो तुम्हाला बघायला मिळाला नसेल तर आता काळजी करायची काळजी करू नका. हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता. आता तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत या अॅनिमेटेड चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.(Mufasa: The Lion King OTT Release)

जागतिक बॉक्स ऑफिसवर 709 मिलियन डॉलर (6,184,759,435 भारतीय रुपये) कमावणारा डिस्ने चित्रपट बुधवार, 26 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘मुफासा : द लायन किंग’ हा चित्रपट डिस्ने+ वर स्ट्रीमिंग साठी उपलब्ध असेल. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुफासा: द लायन किंग’ या क्लासिक चित्रपटाचा हा प्रीक्वल असून १९९४ मध्ये आलेल्या याच नावाच्या चित्रपटाचा ही रिमेक आहे. हिंदी व्हर्जनमध्ये शाहरुख खान, अबराम खान, आर्यन खान, श्रेयस तळपदे आणि संजय मिश्रा यांनी व्हॉइसओव्हर दिले आहेत. शाहरुख खानने मुफासाला, आर्यन खानने सिम्बाला, अबराम खानने यंग मुफासाला, संजय मिश्राने पुम्बाला आणि श्रेयस तळपदे ने टिमोनला आवाज दिला.(Mufasa: The Lion King OTT Release)
=================================
हे देखील वाचा: MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor साकारणार भूमिका !
================================
हा चित्रपट संपूर्ण भारतात इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाला होता. ‘मुफासा : द लायन किंग’ हा चित्रपट 2019 मध्ये आलेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटाचा प्रीक्वल होता. याबाबतची ऑफिशियल पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टसोबत शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुफासाची कहाणी अनुभवण्याची वेळ आली आहे.