राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ;त्या;

राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ;त्या; व्हिडिओने वेधलं लक्षb
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे… त्यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर यावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे… अशातच राणी आणि शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे… काय आहे या व्हिडिओ मागचं रहस्य जाणून घेऊयात..(Entertainment News)

राणी मुखर्जी आणि शाहरुख खान ३० वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम करत आहेत… विशेष म्हणजे या दोघांनाही पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला आहे… याच आनंदात शाहरुख आणि राणी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे… हा व्हिडिओ पोस्ट करत शाहरुखने लिहिलं आहे की, “राष्ट्रीय पुरस्कार...आमच्या दोघांची अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण झाली आहे…अभिनंदन राणी, तू क्वीन आहेस..लव्ह यू”.(Bollywood News)
============================
हे देखील वाचा : Aishwerya Rai : Miss Universe ला राणी मुखर्जीने केलंलं रिप्लेस!
============================
दरम्यान, शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर राणी मुखर्जीला ‘नॉर्वे व्हर्सेस मिसेस चॅटर्जी’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार येणार आहे. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी एकत्रित ‘कुछ कुछ होता है’, ‘पहेली’, ‘चलते चलते’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… लवकरच राणी मुखर्जी ‘मर्दानी ३’ आणि शाहरुख खान ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे… (Rani Mukherjee and Shah Rukh Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi