Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“नवरा माझा नवसाचा” सिनेमातील ‘ही’ मजेशीर चूक माहित आहे का…?

 “नवरा माझा नवसाचा” सिनेमातील ‘ही’ मजेशीर चूक माहित आहे का…?
कलाकृती तडका कलाकृती विशेष

“नवरा माझा नवसाचा” सिनेमातील ‘ही’ मजेशीर चूक माहित आहे का…?

by Jyotsna Kulkarni 20/09/2024

सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला नवरा माझा नवसाचा हा सिनेमा तुफान गाजला. विचित्र नवस फेडण्यासाठीचा बायकोचा अट्टहास आणि तो पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने केलेला धुर्तपणा या सिनेमातून विनोदी अंगाने दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा खूपच गाजला. त्यानंतर आता या सिनेमाचा दुसरा भाग देखील येत आहे.

२००५ साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचे आजही असंख्य चाहते आहे. १९ वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमातील संवाद, सीन प्रेक्षकांना आजही तोंडपाठ आहेत. सध्या या सिनेमाची टीम ‘नवरा माझा नवसाचा २’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र या दरम्यानच आता १९ वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमातील एक चूक कमालीची व्हायरल होत आहे. पहिल्या भागातील एक मजेशीर चूक समोर आली असून, त्यासंदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by sumit patil (@sumit.patil942)

‘नवरा माझा नवसाचा २’ या सिनेमामध्ये पहिल्या भागातील अनेक कलाकार दिसणार आहे. सोबतच नवीन कलाकारांची देखील फौज यात असेल. सचिन, सुप्रिया आणि अशोक मामा यांच्यासह स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या प्रमोशनचा हेमलचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यातूनच या सिनेमातील एक चूक समोर आली आहे. सुमीत पाटील या इन्फ्लूएन्सरसोबत कोलॅब करत ‘नवरा माझा नवसाच्या २’ टीमनेच हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेमल सुमीतला ‘नवरा माझा नवसाचा’बद्दल आणखी एक गोष्ट सांग असे म्हणते. त्यावर सुमीत तिला उत्तर देताना म्हणतो की, ‘नवरा माझा नवसाचामध्ये जयवंत वाडकरांनी बाबू कालियाला उघडे बघितलेले असते… उघडे म्हणजे दाढी-मिशांशिवाय, पण बाबू कालियाचे वर्णन करताना ते मिशीसोबतच करतात.’ जयवंत वाडकरांचा हा मजेशीर सीनही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओवर सिनेमातील कलाकारांच्याही अनेक कमेंटस आल्या आहेत. सुप्रिया यांनी लिहिले की, ‘क्या बात है! शेवटी आमची चूक पडकली.’ यासोबतच अनेक नेटकऱ्यांनी देखील हा व्हिडिओ बघताना म्हटले की, त्यांनाही ही चूक आताच समजली आहे.

यासोबतच काही महिन्यांपूर्वी याच सिनेमातील अशीच अजून एक चूक समोर आली होती. भक्ती जेव्हा वक्रतुंडला नवस फेडण्यासाठी येण्याकरता तयार करत असते, तेव्हाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भक्ती-वक्रतुंड यांच्यामध्ये संभाषण सुरू असताना एक व्यक्ती मागून डोकावून पाहताना दिसते. श्रीधर सावंत या इन्स्टाग्रामवरील युजरने हा व्हिडिओ शेअर केला होता. ज्याप्रकारे तो माणूस डोकावतो आहे, त्यावरुन तो लाइटमन असावा किंवा तो काळ्या रंगाची फ्रेम घेऊन उभा असलेला इसम असावा. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: navra maza navsacha navra maza navsacha mistake नवरा माझा नवसाचा नवरा माझा नवसाचा २ नवरा माझा नवसाचा चूक
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.