Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

Nawazuddin Siddiqui : “बॉलिवूडपेक्षा मराठी उत्तम चित्रपट बनतात!”
मराठी चित्रपट आणि त्यांना मिळणाऱ्या यशाचं हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार कायमच कौतुक करत असतात… बऱ्याचदा एखाद्या मराठी चित्रपटात बॉलिवूडचा कलाकार कॅमिओ करतो किंवा अख्खा चित्रपटचं प्रोड्युस करतो… आता नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एका मुलाखतीत मराठी चित्रपटांचं विशेष कौतुक करत बॉलिवूडपेक्षाही मराठीत उत्तम चित्रपट बनतात असं तो म्हणाला आहे…

नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुलाखतीत मराठी चित्रपटांचं कौतुक करताना म्हटलं की, “मराठीत नेहमीच चांगले चित्रपट बनत आले आहेत. मी तर म्हणतो की, बॉलीवूडपेक्षा चांगले चित्रपट मराठी इंडस्ट्रीत बनतात. ‘फँड्री’, ‘कोर्ट’ यांसारखे अनेक उत्तम चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत आले आहेत. त्याचं कारण असं की मराठीतल्या सगळ्या कलाकारांना नाटकाची पार्श्वभूमी आहे. आणि त्यामुळेच ते फार तालमी करतात…अभिनयाची उत्तम जाण असणारे कलाकार मराठी इंडस्ट्रीत आहेत”.
पुढे नवाज म्हणाले की, मात्र, कुठेतरी एक दुर्दैवाची बाब अशी आहे की, त्यांना हवं ते स्थान अजून मिळालं नाही आहे… जर का या सगळ्या कलाकारांना घेऊन एखादा बिग बजेट चित्रपट तयार केला गेला किंवा या कलाकारांना जेव्हा स्टार केलं जाईल तेव्हा आणखी सकारात्मक बदल होऊ शकतो”.
================================
हे देखील वाचा: Marathi Films 2025 : बॉलिवूडच्या प्रोडक्शन हाऊसला मराठी चित्रपटांची ओढ!
=================================
दरम्यान, आजवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नाही तर, प्रियांका चोप्रा, अजय देवगण यांसारख्या काही कलाकारांनी उत्कृष्ट मराठी चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे… फिल्मफेअर पुरस्कारांबद्दल म्हणायचं झालं तर यंदा आदिनाथ कोठारे याच्या ‘पाणी’ (Paani Movie) चित्रपटाने चांगलीच बाजी मारली.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi