Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Parineeti Chopra-Raghav Chadha यांनी शेअर केला मुलाचा पहिला फोटो; नाव

१३,३३३ वा प्रयोग, आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदत; Prashant

गोष्ट Asha Parekh ने शशी कपूरला मारलेल्या करकचून मिठीची!

चित्रपती V.Shantaram यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नयनताराचे शुभमंगल: सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर घेतला लग्नाचा निर्णय

 नयनताराचे शुभमंगल: सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर घेतला लग्नाचा निर्णय
Vignesh Shivan-Nayanthara wedding
आईच्या गावात

नयनताराचे शुभमंगल: सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर घेतला लग्नाचा निर्णय

by सई बने 10/06/2022

बॉलिवूडमधील लग्नसमारंभानंतर आता टॉलिवूडमध्येही सनईचे सूर आळवले जाऊ लागले आहेत.  टॉलिवूडमध्ये लेडीसुपरस्टार म्हणून दबदबा असणारी ‘नयनतारा’ दिग्दर्शक विग्नेश विजन यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. या लग्नाला अवघं टॉलिवूड अवतरलं होतंच, शिवाय बॉलिवूडमधील मान्यवर कलावंतही उपस्थित होते. नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाचा स्वागत समारंभ मोठा खर्चिक होणार असून सध्या सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)

महाबलिपुरम येथे एका शानदार हॉटेलमध्ये नयनतारानं विग्नेशसोबत सातफेरे घेतले. आता या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी अवघं टॉलिवूड आणि बॉलिवूड एकत्र येणार आहे. नयनतारा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील वलयांकित नाव. नयताराने आत्तापर्यंत तामिळ, तेलुगु, मल्याळम अशा 75 चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. 

मल्याळम चित्रपट मनसिनक्करे मधून नयनतारानं 2003 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर हिट चित्रपटांबरोबर तिची प्रेमप्रकरणंही गाजली. यामुळे नयनतारा हे नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये कायम प्रकाशझोतात राहिलं. तिचं नाव तिच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे आणि प्रेमप्रकरणांमुळेही बरेच गाजले आहे. 

नयनतारानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात अभिनेता सिलंबरासन राजेंदर सोबतचं तिचं नातं गाजलं. मात्र दुबई येथील एका चित्रीकरणादरम्यान या दोघांचे खाजगी फोटो सोशल मिडीयावर आले आणि त्यातूनच हे नातं दुरावलं. यानंतर नयनताराच्या आयुष्यात अभिनेता प्रभुदेवाची एंट्री झाली. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)

सन 2008 मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनीही गुप्तपणे विवाह केल्याच्या बातम्याही आल्या.  प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्यानं तिच्या नावाचा टॅटूही काढला.  अर्थात नयानताराचेही प्रभुदेवावर प्रेम होते. त्यामुळेच ख्रिश्चन असलेल्या नयानतारानं 2011 मध्ये हिंदू धर्माचा स्विकार केला. मात्र या प्रेमप्रकणात प्रभुदेवाची पत्नी, लता मध्ये आली. प्रभुदेवाला घटस्फोट द्यायला तिने नकार दिला. तसंच मुलांची जबाबदारीही प्रभुदेवा घेत नसल्याचा आरोप तिनं केला. लतानं प्रभुदेवाविरोधात कोर्टात धाव घेतली. ही केस खूप गाजली.  

दाक्षिणात्य जनतेला आपल्या हिरोनं असं विवाह मोडून दुसरं लग्न करणं मान्य झालं नाही. जनमत लताच्या बाजूनं होतं. त्यात लोकांनी नयनताराला व्हिलनची उपमा दिली. तिचा धिक्कार होऊ लागला. अगदी तिच्याविरोधात मोर्चेही निघाले. या सर्वांमुळे नयनतारानं माघार घेतली. प्रभुदेवासोबत लग्नाच्या निर्णयापर्यंत आलेली नयनतारा या सर्वांपासून दूर म्हणजे, अभिनयापासूनही काही काळ दूर गेली.  (Nayanthara – Vignesh Shivan wedding)

त्यानंतर नयनताराच्या आयुष्यात 2015 मध्ये विग्नेश या चित्रपट दिग्दर्शकाची एन्ट्री झाली. सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विग्नेश हा प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक असून त्याचा कथुवाकुला रेंडुकधल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात विजय सेतुपति, नयनतारा आणि समंथा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय विग्नेशचा O2 हा चित्रपट 17 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. यातही नयनतारा प्रमुख भूमिकेत आहे. याबरोबरच नयनतारा आणि विग्नेश आगामी एके 62 या चित्रपटाचं चित्रीकरण करत असून, हा चित्रपटही लवकरच मोठ्या पडद्यावर येईल.   

नयनताराचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचे वडील एअर फोर्समध्ये ऑफीसर होते. त्यामुळे तिचे शालेय शिक्षण चेन्नई, जामनगर, दिल्ली, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे. यामुळेच नयनतारा अनेक भाषा बोलू शकते. चित्रपटात आल्यावर या भाषाबहुल्याचा तिला फायदा झाला. अर्थात तिला चित्रपटात करिअर करण्याची इच्छा नव्हती. तिला सीए व्हायचं होतं. मात्र कॉलेजमध्ये असताना तिला मनसिनक्करे चित्रपटाची ऑफर आली. हा चित्रपट हिट ठरल्यानं नयनतारा शिक्षणाला रामराम ठोकून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्थिरावली. पुढे कन्नड, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम चित्रपटात नयनतारा नावाची जादू कायम राहिली.  (Nayanthara – Vignesh Shivan wedding)

==========

हे देखील वाचा – या पाकिस्तानी चाहत्यामुळे हेमा मालिनीने गमावली आपली जवळची व्यक्ती..

==========

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री म्हणूनही नयनताराचा उल्लेख केला जातो.  नयनतारा, 2018 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 या लिस्टमध्ये सामिल झालेली पहिली दाक्षिणात्य अभिनेत्री होती.  

याच नयनताराच्या लग्नाची आणि स्वागत समारंभाची धूम सध्या चालू आहे. त्यासाठी शाहरुख खाननंही उपस्थिती लावली आहे.  शाहरुख आणि नयनतारा ही जोडी ‘जवान’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.  याबरोबरच रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, कार्ति, विजय सेतुपति, समंथा, रुथ प्रभु असे सर्व कलाकार या समारंभात सहभागी होतील. याशिवाय या समारंभाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिनही उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. (Nayanthara – Vignesh Shivan wedding)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Celebrity Celebrity News Entertainment Featured Nayanthara Nayanthara - Vignesh Shivan wedding Vignesh Shivan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.