Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे थेट स्वतःच आयलंड… 

 ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे थेट स्वतःच आयलंड… 
Jacqueline Fernandez Private-Island
मिक्स मसाला

ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे थेट स्वतःच आयलंड… 

by Team KalakrutiMedia 15/05/2025

Bollywood Celebrity: भारतात सेलिब्रिटींचं उत्पन्न कोट्यवधींच्या घरात असतं, आणि म्हणूनच ते एक झगमगाट पूर्ण आणि ऐशोआरामाचं जीवन जगतात. चित्रपटसृष्टीतील कलाकार हे देशातील सर्वाधिक मानधन घेणारे लोक मानले जातात. त्यांची कमाई केवळ चित्रपटांपुरती मर्यादित नसते.तर  विविध कार्यक्रम, जाहिराती, पुरस्कार समारंभ, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. काही वेळा, या बाह्य कार्यक्रमांतून मिळणारी कमाई त्यांचं मूळ चित्रपट मानधनही मागे टाकते. यामुळेच हे कलाकार आलिशान जीवनशैलीत रममाण होतात. ब्रँडेड डिझायनर कपडे, राजवाड्यासारखी घरं, महागड्या गाड्या, आलिशान पार्टी आणि परदेशातल्या सुट्ट्या हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असतो. ज्याची स्वप्नं सामान्य माणूस फक्त बघत राहतो, ती स्वप्नं हे तारे प्रत्यक्षात जगतात. (Jacqueline Fernandez Private-Island)

Jacqueline Fernandez Private-Island
Jacqueline Fernandez Private-Island

काही सुपरस्टार्सकडे खासगी विमानं, आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्यांचा संग्रह असतो, पण आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने केवळ हेच नव्हे, तर स्वतःचं एक खासगी बेट देखील विकत घेतलं आहे! होय, ती अशी एकमेव अभिनेत्री आहे जिच्या नावावर एक खासगी बेट आहे. खरतर अशी गोष्ट स्वप्नातही विचारात येत नाही.पण हे खर आहे. तुम्हाला वाटत असेल की ही कोणीतरी ए-लिस्ट अभिनेत्री असेल, जसं की दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित किंवा ऐश्वर्या राय पण तर तसं नाहीये. ही अभिनेत्री म्हणजे सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली जॅकलीन फर्नांडिस आहे.

Jacqueline Fernandez Private-Island
Jacqueline Fernandez Private-Island

जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक काळापासूनभारतीय सिनेसृष्टीत सक्रिय आहे. ती अशी एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने खासगी बेट विकत घेतलं आहे. हे बेट श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ आहे आणि सुमारे चार एकर क्षेत्रफळाचं आहे. 2012 साली तिने हे बेट सुमारे $600,000 म्हणजेच तेव्हा सुमारे ₹3 कोटी मध्ये विकत घेतले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जॅकलीन या बेटावर एक आलिशान व्हिला बांधण्याची योजना करत होती. मात्र, हा व्हिला तिच्या वैयक्तिक वापरासाठी होता की व्यवसायिक उपयोगासाठी याबाबत तिने कधीच अधिकृतपणे खुलासा केला नाही. तसेच, सध्या ती या बेटाचा काय उपयोग करत आहे, याबाबतही कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही.

============================

हे देखील वाचा: ‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh Bachchan यांनी तोडले मौन; Operation Sindoor वर व्यक्त केल्या भावना !

============================

श्रीलंकेची माजी सौंदर्यवती जॅकलीनने मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात केली आणि 2009 मध्ये ‘अलादीन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, 2011 साली आलेल्या ‘मर्डर 2′ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर ‘हाउसफुल 2’, ‘रेस 2’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत ती झळकली. काही वर्षांनी मात्र तिच्या अनेक चित्रपटांनी अपेक्षित यश मिळवलं नाही. 2025 साली तिचे दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यात  ‘हाउसफुल 5’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ यांचा समावेश आहे आणि हे दोन्ही चित्रपटांत तिच्यासोबत अक्षय कुमार झळकणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Celebrity Deepika padukon Entertainment jacqueline fernandez jacqueline fernandez Boyfriend jacqueline fernandez Iceland Priyanka Chopra
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.