डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

नवी मालिका ‘Vachan Dile Tu Mala’ लवकरच भेटीला; अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत ची नवी जोडी येणार भेटीला !
स्टार प्रवाह आपल्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि आकर्षक आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. वाहिनीने चांगल्या कथा, सशक्त पात्रं आणि समाजाशी संबंधित विषयांच्या माध्यमातून एकाच वेळी मनोरंजन आणि सामाजिक संदेश दिला आहे. आता, स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन, प्रेरणादायी मालिका ‘वचन दिले तू मला’ घेऊन येत आहे. ही कथा आहे एका हुशार आणि धाडसी अॅडव्होकेट ऊर्जाची, जी न्याय मिळवण्यासाठी झगडते आहे. तिच्या संघर्षात तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अॅडव्होकेट शौर्य. (Vachan Dile Tu Mala Serial)

एक संवेदनशील छेडछाड प्रकरण हाताळताना ऊर्जात्या प्रकरणात निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात उभी राहते. हर्षवर्धन, जो अत्यंत अहंकारी आणि पराभव स्वीकारू न शकणारा आहे, त्याच्या सामर्थ्याला ऊर्जा धैर्याने तोडते. मालिकेतील हा संघर्ष आणि दोघांमधील लढाई प्रेक्षकांना खूप आवडेल.

या मालिकेतून नवीन जोडी अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अनुष्का सरकटे, जी ‘ऊर्जा शिंदे’ या पात्राची भूमिका साकारणार आहे, आणि ती या भूमिकेबद्दल सांगते की, “ही माझ्यासाठी एक अनोखी आणि महत्त्वाची भूमिका आहे. ऊर्जा एक प्रामाणिक वकील आहे, जी आपल्या वडिलांच्या मूल्यांवर ठाम आहे. तिचा संघर्ष आणि तिच्या मनातील न्यायाचा विचार प्रेक्षकांना नक्कीच भावेल.” तर इंद्रनील कामत हा ‘शौर्य जहागिरदार’ या पात्रात दिसणार आहेत, तो या भूमिकेबद्दल म्हणाला की, “स्टार प्रवाहसोबत काम करणं खूप मोठं भाग्य आहे. शौर्य एक प्रेमळ, सज्जन वकील आहे. याआधी अशा प्रकारच्या पात्रात काम केलेलं नाही, त्यामुळे या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे.”(Vachan Dile Tu Mala Serial)
=============================
=============================
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणतात की, “या मालिकेतून आम्ही समाजाशी जोडलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘ऊर्जा‘ ही एक साधी, परंतु खूप शक्तिशाली मुलगी आहे, जी आपल्या स्वप्नांप्रती प्रामाणिक आहे. तिच्या जीवनातील यशाची कथा आणि शौर्यच्या साथीत तिचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.” आता प्रेक्षकांना ही मालिका कशी वाटते हे लवकर समजेल. ही नवी मालिका ‘वचन दिले तू मला’ १५ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होईल.