‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ऑक्टोबरमध्ये निशब्दम…
बाहुबली फेम अनुष्का शेट्टी आणि आर. महादेवन यांचा निशब्दम हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईमवर रिलीज होत आहे. अमेरिकेच्या सिएटल शहरात निशब्दमचे चित्रिकरण झाले आहे. हा चित्रपट आत्तापर्यंतचा उत्तम कथेचा थ्रिलर सस्पेंन्स चित्रपट असल्याची चर्चा होत आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला असून चित्रिकरणासोबत अनुष्का आणि महादेवन यांच्या अभिनयाचीही चर्चा होत आहे.
या चित्रपटात अनुष्का शेट्टी एका मुकबधिर महिला, साक्षी हिची भूमिका साकारत आहे. साक्षी चित्रकार आहे, तर तिच्या नव-याची भूमिका करणारा आर. महादेवन एंथनीची भूमिका करत आहे. हा एंथनी सेलिब्रिटी संगीतकार आहे. अर्जुन रेड्डी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेली शालिनी पांडे निशब्दम मध्ये सोनालीच्या भूमिकेत आहे. ही सोनाली साक्षीचा आवाज आहे. एकदिवस साक्षीसोबत हावभाव करत बोलणारी ही सोनालीच अचानक गायब होते. त्यातच एका नव्या घरात कोणीतरी राहत असल्याचा भास होतो. हे घर म्हणजे भुताचे निवासस्थान असल्याची बातमी अगदी टीव्हीवर झळकते. यातून या सर्वांत न बोलता येणारी साक्षी काहीतरी बघते… पण ती बोलू शकत नाही. यातून घडणा-या रहस्यमय घटनांच्या मालिकेत पोलीस अधिका-याची एन्ट्री होते. उत्कंठावर्धक होत जाणारा निशब्दम तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषेत असणार आहे. या चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण अमेरिकेत झाले आहे. त्यामुळे या चित्रपटात विदेशी अभिनेतेही दिसणार आहेत. किल बिल आणि रिसर्वायर डॉग फेम माईकल मैडसेन हा मुख्य पोलीस अधिका-याच्या भूमिकेत आहेत. यासोबत अंजली, सुब्बाराजू आणि श्रीनिवास अवासराला यांच्याही भूमिका निशब्दम मध्ये आहेत. हेमंत मधुकर यांची ही कथा असून तेच चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत कोना व्यंकट यांनी पटकथेटी बाजू सांभाळली आहे.
अमेझॉन पाईमवर नुकताच निशब्दमचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तेलुगू, तामिळ मध्ये असणारा हा चित्रपट मल्याळममध्ये डब करण्यात आला आहे. निशब्दमची घोषणा जेव्हा आर. महादेवन यांनी केली होती, तेव्हा हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजीतही येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सायलेन्स नावानं हा चित्रपट इंग्रजीमध्ये येणार होता. मात्र कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे इंग्रजी चित्रपटाचे काम मागे पडले आहे. त्यामुळे सध्यातरी अनुष्का आणि माधवन यांच्या चाहत्यांना तेलुगू किंवा तामिळ भाषेतील हा चित्रपट बघता येणार आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक भाषांमधले चित्रपट घरबसल्या बघता येत आहेत. त्यामध्ये निशब्दमचा समावेश होत आहे.