Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Ashok Saraf : “माझ्या आयुष्यातला हिरो आता…”, निवेदिता यांची भावनिक पोस्ट
मराठी सिने-रंगभूमीचे ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळाल्यानंतर अशोक मामा यांचं जगभरातून कौतुक केलं जात आहे. किंबहुना प्रत्येकाला खऱ्या अर्थाने आज ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजन करणाऱ्या सच्च्या कलाकाराला बहुमान मिळाल्याच्या भावना आहेत. अशोक सराफ यांना सिनेसृष्टीतील या प्रवासात जितकी प्रेक्षकांनी तितकीच त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी साथ दिली. पद्मश्री पुरस्कार दिल्यानंतर पहिल्यांदाच निवेदिता यांनी आपल्या भावना व्यक्त करत “माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान आहे”, असं म्हटलं आहे. (Entertainment update)

२७ मे रोजी हा सोहळा नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न झाला. यावेळी अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी निवेदिता देखील उपस्थित होत्या. पतीला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर निवेदिता यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. निवेदिता लिहितात, “हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असा… तुझा प्रत्येक प्रवास, प्रत्येक टप्पा साक्षी आहे तुझ्या मेहनतीचा, तुझ्या समर्पणाचा. माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान! माझा अभिमान अनंत पटीने वाढला!! खूप खूप अभिनंदन…अशोक”.(Marathi latest entertainment news)
================================
=================================
दरम्यान, पद्मश्री पुरस्कार देण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अशोक सराफ यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देत सन्मानित केलं होतं. राज्य आणि केंद्र सरकारने आपल्या कामाची दखल घेत दोन दिग्गज पुरस्कार दिल्यानंतर अशोक यांनी सरकारचे आभार मानले. तसेच, आता कलाकार म्हणून जबाबदारी आणखी वाढली आहे असं देखील त्यांनी म्हटलं. आधार अशोक सराफ कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा. मा. या मालिकेत काम करत असून लवकरच त्यांचा पुन्हा एकदा साडे माडे तीन हा चित्रपट भेटीला येणार आहे. (Ashok Saraf movies)