Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Nivedita Saraf : “अशोक आणि लक्ष्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली!”
काही अभिनेत्यांशिवाय मराठी चित्रपटसृष्टीची कल्पना करणं अशक्य आहे. आणि त्यातील दोन महत्वाची नावं म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). जसे हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत; अगदी तशीच ही मराठी चित्रपसृष्टी या दोघांच्या अभिनयाशिवाय अपूर्ण आहे. आजही विनोदी चित्रपट कोणता पाहायचा असा प्रश्न पडला की आपसूकच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘धूमधडाका’, ‘शेजारी शेजारी’ चित्रपट पाहिले जातात. दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात पुन्हा एकदा अशोक-लक्ष्याच्या जोडीची आठवण करुन देत निवेदिता सराफ (Nivedita Saraf) म्हणाल्या की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली आहे.
===========
हे देखील वाचा : Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास करणारी बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण
===========
नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वाहिनीनीने विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तसेच, या खास प्रसंगी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची उणीव भरुन काढण्यासाठीलक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोन आला आणि त्यांचा आवाज ऐकून सर्वजण त्यांच्या आठवणींमध्ये हरवून मंत्रमुग्ध झाले. या पुरस्कार सोहळ्यात निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की,”जेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी डबघाईला आली होती तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांनी तिला जीवित ठेवलं. ज्यामुळे आपण आज हे सगळे दिवस बघतो आहे”. (Marathi film industry)

तसेच, केंद्र सरकारने अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार देखील मानले. परंतु, हा पुरस्कार अशोक सराफ यांना फार आधी मिळायला हवा होता अशी खंत देखील त्यांनी व्यक्त करुन सांगितली. निवेदिता सराफ काही दिवसांपूर्वी आलेल्या फसक्लास दाभाडे चित्रपटात दिसल्या होत्या. तर अशोक सराफ लवकरच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आणि ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटात दिसणार आहेत. (Marathi film update)