Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील;

“मी कट्टर भाजप समर्थक”; Nivedita Saraf यांचं बिहार निवडणूकीच्या निकालानंतरच विधान चर्चेत!
ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना काही दिवसांपूर्वी गंधार गौरव पुरस्कार जाहिर झाला होता… १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला… यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी भाजप पक्षाला पाठिंबा देत मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं म्हटलं… दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी देखील भाजप पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं केलं होतं… आता नेमकं निवेदिता सराफ काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात… (Nivedita Saraf)
गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर निवेदिता सराफ म्हणाल्या की, “आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच इमोशनल होता. मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे. नुसता पुरस्कार मिळाला असं नाही, तर ज्यांच्याकडून पुरस्कार मिळाला, माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे, ती खरंच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या हस्ते तुम्ही मला हा पुरस्कार दिलात, हे तुम्हाला सुचलं त्यासाठी मनःपूर्वक आभार.”

पुढे त्या म्हणाल्या की, “मंचावर उपस्थित सगळे नेते.. आमदार संजय केळकर.. खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल.. मी जरा कट्टर बीजेपी असल्यामुळे (कट्टर भाजप समर्थक) मला फारच अभिमान वाटत आहे”. याशिवाय बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपाचा विजय झाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांन अभिनंदन देखील केलं…

पुढे निवेदिता यांनी अभिनय प्रवासाबद्दल बोलताना असं म्हटलं की, “माझ्या आयुष्याची सुरुवात बालनाट्यातून झाली. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून मी कामाला सुरुवात केली. सुधाताईंनी स्टेजवर उभं राहायला शिकवलं. नाटक कसं बघितलं गेलं पाहिजे, याचं शिक्षणही लहान मुलांना बालनाट्य शिबिरातून दिलं जात आहे. सगळेच क्रिकेटच्या शिबिराला गेल्यावर सचिन तेंडुलकर बनत नाहीत, आणि सगळेच गाणं शिकायला लागल्यावर सोनू निगम बनत नाहीत. पण चांगले श्रोते-प्रेक्षक बनतात. त्यांच्या अंगी सभाधीटपणा वाढतो. तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मदत होते”…. (Marathi Entertainment News)
================================
================================
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बऱ्याच वर्षांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ अशोक मा.मा या मालिकेत एकत्र दिसले होते… तसेच, येत्या काळात कदाचित अशोक सराफ आणि निवेदिता सराफ कदाचित बालनाट्य करणार असल्याचं समोर येत आहे… त्यामुळे पुन्हा एकदा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी नाटक किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून समोर कधी येणार याची चाहते वाट नक्कीच पाहात आहेत… (Ashok Saraf)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi