डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

‘कांतारा १’ मधील देवीचा उल्लेख ‘फीमेल’ घोस्ट असा केला; Ranveer Singh पुन्हा ट्रोलींगचा शिकार झाला
सगळीकडे एकाट चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि तो म्हणजे ‘धुरंधर’ (Dhurandhar)… अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा या चित्रपटात आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणार हे ट्रेलरमधून तरी स्पष्ट होतंय… पण सध्या रणवीर (Ranveer Singh) ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : द लेजेंड- चॅप्टर १’ चित्रपटाबद्दल त्याने केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे… गोव्यात संपन्न झालेल्या ५६व्या इफ्फीत (IFFI 2025) फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते… आणि यावेळी ‘कांतारा १’ चित्रपटाचं आणि ऋषभचं कौतुक करत रणवीरने ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचा उल्लेख करत त्याच्या अंगात देवीच्या ऐवजी फिमेल घोस्ट आलं होतं असं म्हटलं, याच त्याच्या विधानामुळे तो ट्रोल झाला आहे… नेमकं काय म्हणाला आहे रणवीर सिंग जाणून घेऊयात… (Bollywood)
दरम्यान, सध्या रणवीर त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय… याचदरम्यान गोव्यात संपन्न झालेल्या ५६व्या इफ्फी सोहळ्यात त्याने हजेरी लावली होती… यावेळी बोलताना रणवीरने ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाचं कौतुक केलं… रणवीर म्हणाला की, “मी तुझा चित्रपट थिएटरमध्ये बघितला आणि खरं सांगू तर तुझा अभिनय शानदार होता. विशेषत: जेव्हा तुझ्या अंगात फीमेल भूत येतं तो सीन भारीच होता. तुम्ही कांतारा पाहिला का? तो शॉट पाहिला का…? कोणाला मला ‘कांतारा ३’ मध्ये बघायची इच्छा आहे? याला सांगा”… (Kantara : The Legendd-Chapter 1 News)

ज्यावेळी रणवीरने फीमेल घोस्ट असं म्हटलं तेव्हा ऋषभ शेट्टीलाही (Rishabh Shetty) हसू आवरता आलं नाही… पण त्याच्या मागे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे निराशा दिसत होती… शिवाय, नेटकऱ्यांनीही रणवीरला खडेबोल सुनावले आहेत… चामुंडीडीदेवीचा उल्लेख फीमेल भूत असा केल्यामुळे त्याला लोकांच्या रोषाचा सामना पत्करावा लागला आहे… आता त्याच्या या विधानाचा परिणाम आगामी ‘धुरंधर’ चित्रपटावर होणार अशी चर्चा देखील सुरु झाली आहे… दरम्यान, ‘कांतारा १’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने देशभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे तर जगभरात ८५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे… (Kantara movie box office collection)
बरं, रणवीर सिंग ट्रोल झाल्याची ही पहिली घटना नाही… या आधी न्यूड फोटोशुट केल्यामुळेही त्याला लोकांच्या रामागाच सामना करावा लागला होता… आपल्या हिंदु संस्कृतीत हे बसतं का? असा प्रश्नही उपस्थित केला गेला होता… याव्यतिरिक्त त्याच्या फॅशन आणि स्टाईलिंगमुळे तो कायम चर्चेत असतोच.. आणि आता कांतारा चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखेबदद्ल त्याने केलेलं विधान हे त्याच्या चाहत्यांना नक्कीच अपेक्षित नव्हतं.. आता घडलेल्या प्रकरणाबद्दल रणवीर सिंग काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Ranveer Singh trolling news)
================================
हे देखील वाचा : Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा एनर्जेटीक धमाका!
================================
तसेच, रणवीर सिंग आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाची कथा मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जात होतं… मात्र, दिग्दर्शकांनी याबद्दल स्पष्ट जाहिर करत हा त्यांचा बायोपिक किंवा त्यांच्याशी निगडित चित्रपटाची कथा नसल्याचं सांगितलं होतं… त्यामुळे आता नेमकी धुरंधरची कथा आहे तरी काय असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे… दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीरसोबत संजय दत्त, अर्जून रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत… (Dhurandhar movie)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi