Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Chhorii 2 : थरकाप उडवणारा नुसरतच्या छोरी २ चा टीझर रिलीज
विशाल फुरीया दिग्दर्शित ‘छोरी’ (Chhorii) हा चित्रपट २०२१ मध्ये प्रचंड गाजला होता. अभिनेत्री नुशरत भरुचा हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या या हॉरर थ्रिलर चित्रपटाचा आता दुसरा भाग लवकरच येणार असून थरकाप उडवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘छोरी २’ (Chhorii 2) चित्रपटाचा भयावह टीझर समोर आला असून सीक्वेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Bollywood horror movies)
‘छोरी’ हा विशाल फुरीया यांच्याच ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्यात विक्रम गायकवाड़ आणि पूजा सावंत (Pooja Sawant) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता चार वर्षांनंतर याचा सीक्वेल येत्या ११ एप्रिल २०२५ ला अॅमेझोन प्राईम या ओटीटी (Amazon prime) प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Entertainment news)

Chhorii 2 चित्रपटाच्या टीझरमध्ये एक छोटी मुलगी हातात कंदिलाचा दिवा घेऊन विहिरीजवळ जाते. अचानक तिचा पाय ओढून तिला खेचण्यात येते. त्यानंतर एका पडक्या घरात नुसरत भरुचाची (Nushrratt Bharucha) एन्ट्री होते आणि तिथे दिसते चेहऱ्यावर काळी ओढणी घेऊन उभी असलेली सोहा अली खान. या हॉरर थ्रिलर चित्रपटात नुसरत सोबत सोहा अली खान, गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani), सौरभ गोयल, पल्लवी अजय झळकणार आहेत. (Bollywood upcoming movies)
===========================
हे देखील वाचा:Akshay Khanna : ‘छावा’त औरंगजेब साकारण्यासाठी अक्षयने ठेवली होती अट!
===========================
आत्तापर्यंत Nushrratt Bharucha ने मोजक्या पण दमदार कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. ‘डर’, ‘प्यार का पंचनामा’, ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl), ‘अजीब दास्ता’, ‘जनहित में जारी’, ‘राम सेतू’ (Ram Setu), ‘अकेली’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आणि आता हॉरर-थ्रिलर ‘छोरी २’ (Chhorii 2) चित्रपटात पुन्हा एकदा नव्या रुपात ती येणार असून या चित्रपटाचा खास प्रीमिअर भारत जगभरातील सुमारे २४० देशांतील प्रेक्षकांसाठी ११ एप्रिल २०२५ रोजी प्राइम व्हीडिओवर रिलीज केला जाणार आहे. (Chhorii 2 teaser)