प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

OMG 2 Teaser: ‘रख विश्वास तू है शिव का दास’, बहुप्रतीक्षित’ओह माय गॉड 2′ चा टीजर रिलीज
अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो‘ओह माय गॉड 2’चा टीझर अखेर आला आहे, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटामुळे आधीच चर्चेत होता. दरम्यान, चाहत्यांची उत्सुकता लक्षात घेऊन या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाच्या काही मिनिटांच्या टीझरमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी महादेवाचे नाव ऐकायला मिळणार असून यावेळी अक्षय एका भक्ताची कथा घेऊन प्रेक्षकांसमोर आल्याचे दिसत आहे. ज्यात अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत दिसत आहे. त्याने कपाळावर लांब जाट आणि राख घातली आहे.अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी भगवान शिव भक्त की भूमिका साकारली आहे. याशिवाय अभिनेत्री यामी गौतमी देखील या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या टीझरला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.(OMG 2 Teaser)

या सिनेमाचा टीझर शेअर करताना अक्षयने ”रख विश्वास” अस लिहिल आहे. ‘ओएमजी २’ च्या टीझरमध्ये एका भक्ताची अगाध श्रद्धा आणि मेहनत दाखवण्यात आली आहे. या आधीच्या चित्रपटात अक्षय कुमार भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत होता आता या भागात तो भगवान शंकराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी भगवान शिवभक्त कांतिशरण मुद्गल यांची भूमिका साकारत आहेत. कांतिशरण मुद्गल विश्वासू आहे आणि खूप मेहनत करतो.या सिनेमाचा 1 मिनिट 12 सेकंदाचा टीझर पाहिल्यावर हा सिनेमा आधीच्या चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचं दिसतंय. परेश रावल स्टारर चित्रपटात देव किंवा अल्लाहच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या पंडित आणि मौलवींना टोमणे मारण्यात आले होते. त्याचबरोबर या नव्या चित्रपटात एक वेगळीच कथा आहे. ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाचा काही मिनिटांचा टीझर पाहून चाहते या चित्रपटासाठी अधिकच उत्सुक झाले आहेत.

अमित राय दिग्दर्शित ‘ओह माय गॉड २’ हा मूळ चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यात अक्षय कुमारने पहिल्या भागात भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. तर यावेळी तो भगवान शंकराच्या अवतारात दिसत आहे. त्याची टॅग लाईन आहे – श्रद्धा ठेवा, तुम्ही शिवाचे सेवक आहात. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.(OMG 2 Teaser)
=========================
हे देखील वाचा: Jawan Teaser: शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ सिनेमाचा धमाकेदार टीजर रिलीज
=========================
हा टीझर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या महिनाभर आधी रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर करताना लिहिले आहे- रख विश्वास, ओएमजी 2 चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये सांगितले आहे.