Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Panchayat 4 : फुलेरा गावातील निवडणूकीची रणधुमाळी ‘या’ दिवशी अनुभवता येणार!
मातीशी जोडला गेलेला कंटेंट कायमच प्रेक्षकांना भावतो. चित्रपट किंवा वेब सीरीजमधून अलीकडे गावाकडच्या गोष्टी फार पाहिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यापैकी एक गाजलेली वेब सीरीज म्हणजे ‘पंचायत’ (Panchayat). आत्तापर्यंत ‘पंचायत’च्या ३ सीझन्सने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गालातील राजकारण, मैत्री, प्रेम हे सारं काही या एका सीरीजमध्ये पाहायला मिळालं. लवकरच ‘पंचायत ४’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सीरीजची रिलीज डेट अखेर जाहिर करण्यात आली आहे. (Panchayat web series)

‘पंचायत ३’ च्या भागात शेवटी फुवेरा गावातील निवडणूकीच्या रमधुमाळीत प्रधानजींना गोळी लागते आणि त्यामुळे संपूर्ण गाव पेटून उठतं. आता नेमकी प्रधानजींवर गोळी का आणि कोणी झाडली याचं उत्तर ‘पंचायत ४’ (Panchyata 4) मध्ये मिळणार आहे. आता आनंदाची बातमी अशी की अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पंचायत ४ ही सीरीज प्रेक्षकांना २ जुलै २०२५ पासून पाहता येणार आहे. (Entertainment)
आता ‘पंचायत ४’ मध्ये रिंकी आणि अभिषेकचं प्रेम प्रकरण पुढे लग्नापर्यंत जाणार का? आणि त्यांच्या लग्नाबद्दल प्रधानजी आणि मंजू देवी यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. शिवाय फुलेरा गावातील पंचायत निवडणूकीचा निकाल काय लागणार? गावचा नवा प्रधान कोण होणार हे पाहणं देखील तितकचं महत्वाचं असणार आहे. (Bollywood news)

दरम्यान, ‘पंचायत’ सीरीज ही एका खऱ्या गावात शुट केली आहे आणि फुलेरा गावचं पंचायत ऑफिस हे देखील खरं आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर, ’पंचायत’ या वेब सीरिजमध्ये कथानकानुसार फुलेरा (Phulera) हे गाव उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्ह्यात असल्याचं म्हटलं गेलं आहे. मात्र, संपूर्ण सीरिजचं शूटिंग मध्यप्रदेशमधील एका गावात झालं आहे.मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील महोडिया गावात ‘पंचायत’च्या तीन सीझनचं शूट झालं.. यावेळी सर्व कलाकार गावातच राहात होते… (Real and reel shooting locations)
================================
हे देखील वाचा: Panchayat 4: फुलेरा गावात रंगणार निवडणूकीची रणधुमाळी; ‘पंचायत’चा टिझर रिलीज
=================================
‘पंचायत’ (Panchayat) या वेब सीरीजचे ३ भाग यशस्वी झाले असून लवकरच चौथा भाग येणार असं सांगण्यात आलं आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित पंचायत सीरीजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सानविका, चंदन रॉय, फैजल मलिक, दुर्गेश कुमार, सुनिता राजवर, पंकज झा यांच्या भूमिका आहेत. (Web series)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News