Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Panchayat 4: फुलेरा गावात रंगणार निवडणूकीची रणधुमाळी; ‘पंचायत’चा टिझर रिलीज
अवघ्या कमी काळात लोकप्रिय झालेल्या ‘पंचायत’ (Panchayat) वेब सीरीजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फुलेरा गावात यंदा पंचायत निवडणूक होणार असून गावातील सगळेच तयारी कशी करत आहेत आणि कोण विजय झेंडा हाती घेणार हे या चौथ्या भागात समजणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रधानजी (रघुबीर यादव) आणि भूषण (दुर्गेश कुमार) यांच्यात थेट सामना होणार आहे. (Panchayat Web series)

‘पंचायत ४’ (Panchayat 4) मध्ये फुलेरा गावातील राजकारण अधिक तापलेले दिसणार आहे. नुकताच चौथ्या भागाचा टीझर समोर आला असून यात प्रचाराचा गोंधळ, मतदारांच्या रांगा, विधायकजींचा डान्स आणि सचिवजी-रिंकीच्या प्रेमाची सुरुवात या सगळ्याची झलक पाहायला मिळते. प्रचारांच्या घोषणाबाजीत बाजी कोण मारणार याकडे फुलेरा गावातील नागरिकांसह प्रेक्षकांचंही लक्ष लागलं आहे. (Web series)
===============================
हे देखील वाचा: Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….
===============================
२०२० मध्ये पंचायत सीजीझचा पहिला सीझन आला होता. पहिल्या सीझनपासूनच कथा आणि पात्रांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पंचायत वेब सीरीजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक, सुनीता रजवार आणि पंकज झा असे अनेक कलाकार असून वेब सीरीजची कथा चंदन कुमार यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. ‘पंचायत’४ प्रेक्षकांना २ जुलै २०२५ पासून Amazon Prime Video वर पाहता येणार आहे. (Entertainment)