Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Panchayat 4 : प्रेक्षकांना कशी वाटली फुलेरा गावातली निवडणूक?
सोशल मिडियावर सध्या पंचायत ४ (Panchayat Season 4) या वेब सीरीजची विशेष चर्चा आहे… फुलेरा गावात होणाऱ्या निवडणूकीची उत्सुकता प्रत्येकाला लागली असून फुलेरा गावाचा नवा प्रधान कोण असणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर आहेत… अॅमेझॉन प्राईमवर पंचायत वेब सीरीजचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर आता ही सीरीजची मालिका चौथ्या भागापर्यंत येऊन पोहोचली आहे… नुकताच पंचायत सीझन ४ रिलीज झाला असून आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत… जाणून घेऊयात पहिल्या तीन भागांच्या तुलनेत प्रेक्षकांना पंचायत ४ कसा वाटला?(Web Series Review)

सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी पंचायत ४ बद्दल आपली प्रामाणिक मतं व्यक्त केली आहेत… काही प्रेक्षकांना चौथा भाग आवडलाय तर काहींना रटाळ वाटली आहे… काही नेटकरी लिहितात, ‘आधीसारखा ‘पंचायत ४’ वाटला नाही… काही जुने क्षण अनुभवता आले पण एकूणच जितकी चौथ्या सीझनची वाट पाहिली होती तितका भारी वाटला नाही’… तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘पंचायत ४’ ने कॉमिक चार्म गमावला असून राजकारणाकडे कथानक जास्त झुकले आहे. तर काही जणं लिहितात की, ‘हा सीझन अधिक स्पार्क दाखवू शकला असता’.(Bollywood News)

तर काही जणांनी पंचायत ४ चे कौतुक करत कथानकाप्रमाणे हा सीझन प्रामुख्याने निवडणुका आणि राजकारणाभोवती फिरतो हे फारच छान दाखवले आहे… सर्व कलाकारांनी उत्तम काम केले असून विनोद आणि भावनिकता दोन्ही भावना संमिश्रपणे नीट मांडल्या आहेत… तर काही जणांनी पंचायत ४ हा आजच्या तारखेत प्रत्येकाने पाहावी अशी सीरीज आहे असं लिहिलं आहे…(Entertainment Tadaka)
================================
हे देखील वाचा: Panchayat : ‘पंचायत’चं खरं गाव कुठे माहितीये का?
=================================
दरम्यान, पंचायत ४ या वेब सीरीजचं दिग्दर्शन दीपक मिश्रा यांनी केले आहे… या सीरीजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, फैसल मलिक, चंदन रॉय, पंकज झा, अशी भलीमोठी कलाकारांची फौज आहे…(Panchayat 4 Cast)