
Panchayat : ‘पंचायत’चं खरं गाव कुठे माहितीये का?
अनेक वेब सीरीज आपल्याला आवडतात, पण त्यापैकी काही ठराविक सीरीज कायमच्या लक्षात राहतात. अशीच एक वेब सीरीज जिने गावातील लोकांच्या अडचणी, गावातील प्रमुखाची निवड, त्यासाठी केलं जाणारं राजकारण, मतदान अशा अनेक गोष्टींवर हसत-खेळत भाष्य केलं. ती वेब सीरीज म्हणजे ‘पंचायत/ या वेब सीरीजचे तिनही भाग प्रेक्षकांना फार आवडले. प्रत्येक भूमिकेने लोकांची मनं जिंकली. फुलेरा गावातील कथा लोकांना आपलीशी वाटू लागली. आणि ते गाव सगळ्यांच्याच मनात भरलं… दरम्यान, फुलेरा हे गाव सेट नसून एका खऱ्या खुऱ्या गावात सीरीजचं शूट केलं गेलं आहे हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात रिअल फुलेरा गावाबद्दल… (Panchayat Web series)
तर, ’पंचायत’ या वेब सीरिजमध्ये कथानकानुसार फुलेरा (Phulera) हे गाव उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्ह्यात असल्याचं म्हटलं गेलं आहे. मात्र, संपूर्ण सीरिजचं शूटिंग मध्यप्रदेशमधील एका गावात झालं आहे.मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील महोडिया गावात ‘पंचायत’च्या तीन सीझनचं शूट झालं.. यावेळी सर्व कलाकार गावातच राहात होते… (Real and reel shooting locations)

‘पंचायत’मधील सचिवजींचं ऑफिस हे त्या गावातील पंचायतीचं खरं ऑफस आहे. जिथे सचिवाचं राहात असून तिथेच काम करताना देखील ते दाखवले आहेत.. इतकंच नव्हे तर सीरीजमध्ये प्रधानजींच दाखवलेलं घर हे महोडिया ग्राम पंचायतचे माजी सरपंच प्रतिनिधी लाल सिंह सिसोसिया यांचं आहे. शिवाय, ‘पंचायत’च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात पाण्याची टाकी विशेष लक्षवेधी ठरली ती देखील या गावातच पार पडलं होतं. (Panchayat web series shooting locations)

दरम्यान, ‘पंचायत’ (Panchayat web series) या वेब सीरीजचं शुटींग महोडिया या गावात झाल्यामुळे तिथे लोकांची ये-जा अधिक वाढली. गावाकडील शुटींग दाखवण्यासाठी बऱ्याचदा मोठा सेट उभा केला जातो. पण पंचायत या वेब सीरीजमध्ये खऱ्या गावातचं नाव बदलून शुटींग केलं गेलं. दरम्यान, खऱ्या गावाचं नाव न दाखवल्यामुळे तेथील गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. (Bollywood news update)
===========================
हे देखील वाचा:Sharad Kelkar : ‘तान्हाजी’नंतर महाराज का साकारले नाही? शरद म्हणाले….
===========================
‘पंचायत’ (Panchayat) या वेब सीरीजचे ३ भाग यशस्वी झाले असून लवकरच चौथा भाग येणार असं सांगण्यात आलं आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित पंचायत सीरीजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सानविका, चंदन रॉय, फैजल मलिक, दुर्गेश कुमार, सुनिता राजवर, पंकज झा यांच्या भूमिका आहेत. (Web series)