Gulkand : हिंदी चित्रपटांना ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची

Dada Kondke : ‘पांडू हवालदार’ची ५० वर्ष; आजही तेच भन्नाट मनोरंजन
‘पांडू हवालदार’दादा कोंडके यांच्यासाठी महत्वाचा.ते त्यांचे पहिलेच दिग्दर्शन.’सोंगाड्या’हा त्यांनी निर्माण केलेला पहिलाच चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते.’एकटा जीव सदाशिव’चेही दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचेच.दादांनी ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनातील जबाबदारी दिनेश त्यांचे खरे नाव प्रभाकर पेंढारकर यांच्यावर सोपवली. (Dada Kondke)

दादांनी आपल्या तीनही चित्रपटांच्या यशाने हॅटट्रिक साध्य केली.त्यांचा स्वतःचा असा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. पहिल्या तीन चित्रपटांच्या निर्मितीच्या अनुभवातून दादांनी आता पुढचे पाऊल टाकले ते चित्रपट दिग्दर्शनात!
मुंबईतील त्या काळातील हवालदार या भोवतीचे कथानक असलेला गमतीदार चित्रपट ‘पांडू हवालदार’ मुंबईत २ मे १९७५ रजी प्रदर्शित झाला. मुख्य चित्रपटगृह कोहिनूर.पुणे शहरात तत्पूर्वी म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अलका चित्रपटगृहात’पांडू हवालदार’ प्रदर्शित झाला.या दिवशी गुरुवार होता.आणि फर्स्ट शोपासूनच चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत. दादा कोंडके व उषा चव्हाण ही लोकप्रिय जोडी चित्रपटभर फॉर्मात. अशोक सराफही एकदम भारी. (Maathi mlestone films)

या चित्रपटात अपप्रवृत्तींचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्तीरेखेची भूमिका कोणाला द्यायची याचा सुरु झालेला शोध अशोक सराफशी पूर्ण झाला. अशोक सराफनी कॉलेजमध्ये असताना आंतरकॉलेज नाट्य स्पर्धा गाजवल्या. याच काळात म्हणजे वयाच्या १७\१८ व्या वर्षी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकले. पहिलचं नाटक ‘ययाती आणि देवयानी’.अशातच १९६८ साली तो स्टेट बँकेत नोकरीला लागला. तेथे नट आणि नाटककार रमेश पवार यांची भेट झाली.दोघांनी मिळून ‘एकटा’ही एकांकिका सादर केली. अशी वाटचाल सुरु असतानाच १९७१ साली निर्माता आणि दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’या चित्रपटात सॅनेटरी इन्स्पेक्टरची भूमिका मिळाली. ही छोटीशीच भूमिका होती आणि याचा करियरसाठी फारसा फायदा झाला नाही. (Entertainment news)
========
हे देखील वाचा : Apne Rang Hazar : ‘अपने रंग हजार’ची ५० वर्ष; रंगत आली नाही हो….
========
१९७२ साली ‘हिमालयाची सावली’ या नाटकाने अशोक सराफ अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरावत गेला,पण त्यांच्या करियरने मोठा टेक ऑफ घेतला तो दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’या चित्रपटातील सखाराम हवालदार या भूमिकेतून! हा चित्रपट सुपर हिट तर ठरलाच पण तेराव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट विशेष अभिनेत्याचा पुरस्कारही अशोक सराफ यांनी पटकावला.हा चित्रपट अशोक सराफला मिळाला तो नंदकिशोर कलगुटकर यांच्यामुळे. दादांनी सखाराम हवालदार या भूमिकेसाठी निळू फुले यांना विचारले होते. त्यांनी नकार दिल्यावर दादांनी कलगुटकर यांना या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध घ्या असे सांगितले. कलगुटकर यांचे बंधु हीराकांत कलगुटकर यांच्या ‘एकापेक्षा एक सवाई’ या नाटकात अशोक सराफची भूमिका होती. (Nile Phule Utold stories)

दादांच्या पहिल्या दोन्ही चित्रपटातील गाणी लोकप्रिय तर झालीच पण ती विशिष्ट शैलीतील म्हणूनही ओळखली गेली तरीदेखील त्यानंतर दादा कोंडके आणि संगीतकार राम कदम हे का बरे एकत्र आले नाहीत याचे विलक्षण कुतूहल आजही पन्नास वर्षांनंतर कायम आहे. ‘सोंगाड्या’मधील ‘मळ्याच्या मळ्यामदी कोण गं उभी?’, ‘काय गं सखू बोला दाजिबा?’, ‘असा मी काय गुन्हा केला?’, ‘बिब घ्या बिब शिकेकाई’, तर ‘एकटा जीव सदाशिव’मधील ‘नग चालूस दुडक्या चाली’, ‘लबाड लांडगा ढ्वांग करते’, ‘काल रातीला सपान पडलं’ हीदेखील गाणी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय आहेत, तरीदेखील दादा कोंडके व राम कदम ही जोडी का पुन्हा एकत्र आली नाहीत? (Entertainment)

याचं एक कारण असे की, चित्रपती व्ही.शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ मधीलही सगळीच्या सगळी गाणी अशीच अफाट लोकप्रिय झाली आणि याच चित्रपटाची हिंदीत रिमेक करण्याचे ठरले. त्यामुळेच त्या हिंदीतील पिंजरा (हिंदीत ‘पिंजडा’ )च्या ध्वनिमुद्रणासाठी अधिक वेळ देता यावा आणि हिंदीतील पिंजरा प्रदर्शित झाल्यावर आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर चित्रपट निर्मिती संस्थांच्या ऑफर येतील या अपेक्षेने राम कदम यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले. पण हिंदीतील पिंजरा अपयशी ठरला आणि तोपर्यंत दादा कोंडके थांबू शकत नव्हते,त्यामुळे ‘आंधळा मारतो डोळा’ या चित्रपटासाठी संगीतकार प्रभाकर जोग यांना त्यांनी संधी दिली.आणि दादा कोंडके व संगीतकार राम कदम ही जमलेली जोडी फुटली. पांडू हवालदार चित्रपटासाठी दादा कोंडके यांनी राम लक्ष्मण यांना संगीतकार म्हणून पहिली संधी दिली. (Marathi movies)
राम लक्ष्मण म्हणजे सुरेंद्र हेन्द्रे आणि विजय पाटील ही जोडी. हे एका वाद्यवृंदात वादक होते. राम लक्ष्मण हे नामकरण दादा कोंडके यांनीच केले. पांडू हवालदार या चित्रपटातील बाई ग केळेवाली इत्यादी गाणी लोकप्रिय झाली.’पांडू हवालदार’ या यशस्वी चित्रपटाची रिमेकही येणे स्वाभाविक होतेच. त्यासाठी मेहमूदने दादाना हा चित्रपट हिंदीत रिमेक करण्याची ऑफर दिली. या चित्रपटाचे नाव ‘जनता हवालदार ‘(१९७९)असेही त्याने निश्चित केले. स्वतः मेहमूद आणि जोडीला राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका. पण कशावरुन तरी हे जमले नाही आणि मेहमूदने पटकथेत बरेच फेरफार करून हा चित्रपट कसाबसा पूर्ण केला. पण विस्कळीत पटकथेमुळे हा चित्रपट रंगला नाही आणि अर्थातच फ्लॉप झाला. ‘पांडू हवालदार’ या चित्रपटावरुन हिंदीत ‘दो हवालदार’ (१९७९) या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. असरानी आणि जगदीप अशी त्यात जोडी होती. केदार कपूर दिग्दर्शित या चित्रपटात झरिना वहाब,फरिदा जलाल, जयश्री टी. यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे दादा कोंडके यांची हुकमी आय अर्थात आई असलेल्या रत्नमाला याच या चित्रपटात ‘मां’च्या भूमिकेत आहेत. (Bollywood news)

आणखी एक विशेष म्हणजे हा चित्रपट रंगतदार करण्यासाठी या चित्रपटात राजेन्द्रनाथ, मोहन चोटी, धुमाळ, ब्रह्मचारी , मारुती आणि के. एन. सिंग हे एक दोन दृश्यांसाठी पाहुणे कलाकार आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्याने मराठी वस्ती वगळता इतरत्र हा चित्रपट व्यवस्थित रिलीज केला आणि उत्तम यश संपादले. मूळ चित्रपटातील गंमत तितकीशी आली नव्हती.पण थीममध्ये मनोरंजन होते, त्यामुळे ‘दो हवालदार’ रंजक ठरला. या चित्रपटाच्या निमित्ताने जगदीपने दादा कोंडके यांची आवर्जून भेट घेऊन आशीर्वाद घेतले हे अगदी आवर्जून सांगायला हवे.तो फोटो त्या काळात खूप गाजला. तर ‘पांडू हवालदार ‘वरुन खुद्द दादा कोंडके यांनी गुजराती भाषेत ‘चंदू जमादार’ ( १९७९) या नावाने रिमेक केला. खुद्द दादा कोंडके आणि जोडीला लक्ष्मी छाया अशी जोडी जमली. मूळ चित्रपटातील पंचेसच्या जागा दादाना चांगल्याच माहित असल्याने हा गुजराती चित्रपटही धमाल मनोरंजक झाला.मेहुलकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.गुजरातमध्ये हा चित्रपट यशस्वी ठरला. (Bollywood tadaka)
गुजरातीप्रमाणेच दादा कोंडके यांनीच हिंदी चित्रपटाची रिमेक करायला हवी होती असे त्या काळात अनेक चित्रपट रसिकांचे म्हणणे होते. तसे घडले असते तर दादा कोंडके यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत खूप लवकर पाऊल पडले असते. पण ते त्यांनी १९८४ साली ‘तेरे मेरे बीच मे ‘च्या वेळी टाकले. ते थोडे लवकर पडायला हवे होते असे आता जरी म्हणता येत असले तरी दादा कोंडके यांचा महाराष्ट्रात हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला होता आणि त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला हमखास यश मिळत होतेच. आणि दादानीच पुन्हा ‘दो हवालदार ‘ केल्याने मूळ चित्रपटाशी सतत तुलना होत राहिली असती, त्याचे काय? ते जास्त त्रासदायक झाले असते. पन्नास वर्षात कितीदाही ‘पांडू हवालदार’एन्जॉय करावा तोच आनंद, तीच गंमत आञि तीच फुल्ल एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट. (classic movies)
========
हे देखील वाचा : काय तर म्हणे, सैफ व कुणाल कपूरचा “ज्वेल थीफ”
========
आणखी एक विशेष, ‘पांडू हवालदार’ च्या प्रदर्शनास पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त म्हणजेच १९९० साली दादा कोंडके व त्यांच्या चित्रपटांची वितरण व्यवस्था अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून यशस्वी करणारे विजय कोंडके यांनी दादर येथील ब्राॅडवे मिनी थिएटरमध्ये मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी ” पांडू हवालदार “च्या खास खेळाचे आयोजन केले आणि तो खेळ संपल्यावर आम्ही लोणावळ्यात जावून पार्टी केली. ते दिवसच वेगळे होते म्हणा. भारतमाता चित्रपटगृहात आतापर्यंत ‘पांडू हवालदार’ कितीदा रिपीट रनला प्रदर्शित झाला आणि मागील व पुढील पिढीतील चित्रपट रसिकांनी तो पुन्हा पुन्हा एन्जॉय केला याला गणतीच नाही. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे तेच तर वैशिष्ट्य.(Pandu Havaldar movie)